शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

आठ महिन्यात सिलिंडरची २९३ रुपये दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:47 IST

आंतरराष्ट्रीय स्तराचा आढावा घेऊन दर महिन्यात देशांतर्गत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असते. नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत तब्बल ६२ रुपयांनी वाढविली आहे. घरगुती वापराचा अनुदानित सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत असला तरीही ग्राहकांना सिलिंडर खरेदी करताना ९९३ रुपये मोजावे लागत आहे. महागाईने नागरिक आधीच त्रस्त असताना त्यात सिलिंडरच्या दरवाढीने भर पडत आहे. आठ महिन्यात सिलिंंडरची किंमत २९३ रुपयांनी वाढली आहे.

ठळक मुद्देअनुदानित सिलिंडर ४.९४ रुपयांनी वाढले : विनाअनुदानित सिलिंडर ९९३ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय स्तराचा आढावा घेऊन दर महिन्यात देशांतर्गत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असते. नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत तब्बल ६२ रुपयांनी वाढविली आहे. घरगुती वापराचा अनुदानित सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत असला तरीही ग्राहकांना सिलिंडर खरेदी करताना ९९३ रुपये मोजावे लागत आहे. महागाईने नागरिक आधीच त्रस्त असताना त्यात सिलिंडरच्या दरवाढीने भर पडत आहे. आठ महिन्यात सिलिंंडरची किंमत २९३ रुपयांनी वाढली आहे.

डीलरचे कमिशन ग्राहकांकडूनघरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत केंद्राने नोव्हेंबरमध्ये दोनदा वाढ केली. १ नोव्हेबरला किंमत २.९४ रुपयांनी वाढविली तर २ नोव्हेंबरला डीलर्सचे कमिशन पुन्हा २ रुपयांनी वाढवून त्याचा भार ग्राहकांवर टाकला आहे. त्यामुळे नागपुरात अनुदानित सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत आहे. सिलिंडर डीलर्सचे कमिशन २०१७ नंतर वाढविण्यात आले नव्हते. सिलिंडरच्या ने-आण करण्याच्या खर्चात झालेली वाढ, वाढते पगार ही मागणी लक्षात घेता कमिशन वाढविण्यात आल्याची माहिती डीलर्सने दिली. त्यामुळे १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरमागे ५०.५८ रुपये आणि पाच किलो वजनाच्या सिलिंडरमागे २५.२९ रुपये कमिशन मिळत आहे.

आठ  महिन्यात २३१ रुपयांनी महागलेयावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत विना सबसिडी घरगुती गॅसच्या किमतीत तब्बल २९३ रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा हवाला देत सिलिंडरची किंमत वाढविल्यास डिसेंबरमध्ये ११०० रुपयांचा आकडा पार करण्याची दाट शक्यता आहे.

सरकारने दरवाढीवर नियंत्रण आणावेगॅसची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारानुसार देशांतर्गत होत असते. ही बाब खरी आहे. पण दरवाढीमुळे ग्राहक नक्कीच त्रस्त झाला आहे. सिलिंडरची सबसिडी बँक खात्यात जमा होण्यास विलंब होत असल्यामुळे ग्राहकाला महिन्याच्या प्रारंभी गॅस सिलिंडर खरेदीसाठी जास्त आर्थिक तरतूद करावी लागत आहे. वाढत्या महागाईत ही तरतूद गरीब आणि सामान्यांना अशक्य आहे. पेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश आणि घरगुती गॅसच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी लोकमतशी बोलताना केली.अशी  वाढली किंमतएप्रिल ७०० रु.मे ६९९ रु.जून ७४८ रु.जुलै ८०६.५० रु.आॅगस्ट ८४२ रु.सप्टेंबर ८७२ रु.आॅक्टोबर ९३१ रु.नोव्हेंबर ९९३ रु.

टॅग्स :InflationमहागाईCylinderगॅस सिलेंडर