शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

पतीचा रेल्वेतून पडून मृत्यू; पीडित माय-लेकाला आठ लाख रुपये भरपाई

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 24, 2023 17:59 IST

६० दिवसांत रक्कम अदा करण्याचा आदेश

नागपूर :रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई व त्यावर ७.५ टक्के व्याज मंजूर केले. तसेच, ही रक्कम पीडितांना ६० दिवसांत अदा करण्याचा आदेश मध्य रेल्वेला दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

निर्मला व सचिन गडलिंग, अशी मायलेकाची नावे असून ते अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी आहेत. नागोराव गडलिंग, असे मृताचे नाव होते. ते ९ मे २०१५ रोजी नरखेड-भुसावळ पॅसेंजरने वरुड येथून बेनोड्याला जात होते. ते रेल्वे डब्ब्याच्या दारात उभे होते. वरुड यार्ड परिसरात धक्का लागून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पीडित मायलेकाने भरपाईसाठी रेल्वे न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. ३ मे २०१८ रोजी तो दावा खारीज करण्यात आला होता.

धावत्या रेल्वेतून खाली पडलेला प्रवासी रेल्वेखाली येऊ शकत नाही. गडलिंग यांच्या शरीराचे दोन भाग झाले होते. त्यामुळे ते रेल्वेतून खाली पडल्याचे सिद्ध होत नाही. तसेच, ते प्रामाणिक प्रवासी नव्हते, अशी कारणे दावा नाकारताना नमूद करण्यात आली होती. त्यामुळे पीडित मायलेकाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून हा निर्णय दिला. गडलिंग यांच्याकडे प्रवासाचे तिकिट होते. त्यामुळे ते प्रामाणिक प्रवासी होते. तसेच, त्यांनी आत्महत्या केल्याचे किंवा ते रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेखाली आल्याचे पुरावे नाही, असे उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केले.

टॅग्स :Courtन्यायालयAccidentअपघातrailwayरेल्वेHigh Courtउच्च न्यायालय