शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मयताच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई : हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:24 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. २२ डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भरपाई दुप्पट करण्यात आली.

ठळक मुद्देअधिसूचनेनुसार रक्कम वाढवून दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेअपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. २२ डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भरपाई दुप्पट करण्यात आली. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला.महादेव बनसोड असे मयताचे नाव असून तो रामगाव, ता. धामणगाव, जि. अमरावती येथील रहिवासी होता. २५ डिसेंबर २००४ रोजी महादेव बडनेरा येथून धामणगावला जात होता. त्याने प्रवासाचे तिकिट खरेदी केले होते. दरम्यान, धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी गुंफाबाई व मुलगा गजानन यांनी भरपाई मिळण्यासाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. १९ एप्रिल २०१० रोजी न्यायाधिकरणने त्यांना चार लाख रुपये भरपाई मंजूर केली होती. त्या निर्णयाविरुद्ध मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता रेल्वेचे अपील फेटाळून वरीलप्रमाणे सुधारित निर्णय दिला. महादेवचा स्वत:च्या चुकीमुळे मृत्यू झाला. त्याच्याकडे रेल्वे तिकिट आढळून आले नाही. त्यामुळे त्याला भरपाई दिली जाऊ शकत नाही असे रेल्वेचे म्हणणे होते. परंतु, महादेव प्रामाणिक प्रवासी नव्हता हे रेल्वेला सिद्ध करता आले नाही. वारसदारांतर्फे अ‍ॅड. अनिल बांबल यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वेAccidentअपघात