शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वगळले आठ रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:07 IST

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी आणि रुग्णाकडूनही पैसे उकळत असल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कार्यकारिणी समितीने शहरातील आठ मोठ्या रुग्णालयांना साहाय्यता निधीतून वगळले आहे. विशेष म्हणजे, जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांकडून अवैध वसुली केल्याच्या तक्रारीवर या रुग्णालयांना कायम स्वरुपी बडतर्फ केले आहे.

ठळक मुद्देसमितीचा निर्णय : जनआरोग्य, साहाय्यता निधी व रुग्णाकडूनही पैसे उकळल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी आणि रुग्णाकडूनही पैसे उकळत असल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कार्यकारिणी समितीने शहरातील आठ मोठ्या रुग्णालयांना साहाय्यता निधीतून वगळले आहे. विशेष म्हणजे, जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांकडून अवैध वसुली केल्याच्या तक्रारीवर या रुग्णालयांना कायम स्वरुपी बडतर्फ केले आहे.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत या योजनेंतर्गत उपराजधानीत शासकीय व खासगी मिळून ३५ रुग्णालयांचा समावेश होता. जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांवर उपचाराच्या बदल्यात या रुग्णालयांना ‘नॅशनल इन्शुरन्स’ या विमा कंपनीकडून कोट्यवधीची रक्कम अदा करण्यात आली. विमा कंपनीकडून उपचाराचे पूर्ण देयक मिळत असल्याने रुग्णालयांना रुग्णांकडून एकही रुपया घेता येत नाही, परंतु काही रुग्णालयांनी हा नियम धाब्यावर बसवत विविध तपासण्यांसह इतर अतिरिक्त खर्चाच्या नावावर नातेवाईकांकडून लक्षावधी रुपयांची अवैध वसुली केली. याच्या तक्रारी प्राप्त होताच चौकशीला सुरुवात झाली. यात दोषी आढळून आलेल्या ‘क्युर इट हॉस्पिटल’ला २१०५ मध्ये, २०१६ मध्ये ‘होप हॉस्पिटल’, २०१७ मध्ये ‘श्रावण हॉस्पिटल अ‍ॅन्ड किडनी इन्स्टिट्यूट’, आणि २०१८मध्ये ‘मेडीट्रिना हॉस्पिटल’, ‘श्री कृष्णा हृदयालय’, ‘क्रिसेंट हार्ट हॉस्पिटल’, ‘शतायू हॉस्पिटल’ व ‘केशव हॉस्पिटल’ला जनआरोग्य योजनेतून कायमस्वरुपी बडतर्फ केले. ही कारवाई होण्यापूर्वी या हॉस्पिटल प्रशासनाने जनआरोग्य योजनेचा लाभही घेतला आणि मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी व रुग्णांकडूनही पैसे उकळल्याच्या तोंडी तक्रारी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कार्यकारिणी समितीकडे प्राप्त झाल्या होत्या. याची चौकशी झाली. यात लाभार्थ्याकडून जनआरोग्य योजनेत समावेश नसल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचेही आढळून आले. याला गंभीरतेने घेत समितीने नुकतीच बैठक घेतली. या आठही रुग्णालयांना पुढील आदेशापर्यंत मुखमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीमधून आर्थिक मदत न करण्याचा निर्णय घेतला. समितीमध्ये सदस्य सचिव डॉ. के.आर. सोनपुरे, सदस्य विभागीय सचिव डॉ. संजीव कुमार, नोडल अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, सदस्य उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजय जयस्वाल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांचा समावेश आहे.या रुग्णालयांवर कारवाई

  •  क्युर इट हॉस्पिटल
  •  होप हॉस्पिटल
  •  श्रावण हॉस्पिटल अ‍ॅन्ड किडनी इन्स्टिट्यूट
  •  मेडीट्रिना हॉस्पिटल
  •  श्री कृष्णा हृदयालय
  • क्रिसेंट हार्ट हॉस्पिटल
  •  शतायू हॉस्पिटल
  •  केशव हॉस्पिटल
टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीfundsनिधी