लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ईद-उल-अजहा उत्साहाबरोबरच साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून सुरक्षित अंतर पाळले. ईद नमाज पठण केल्यानंतर देशाची सुरक्षा व शांततेसाठी दुआ करण्यात आली. विशेष म्हणजे कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मुस्लिम धर्मगुरूंनी घरातच नमाज पठण करण्याचे आवाहन केले होते.ईदनिमित्त गरजवंतांना मदत करण्यात आली. सोशल मीडियावर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राजकीय व सामाजिक संघटनांनीसुद्धा सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छा शेअर केल्या. ईदनिमित्त घरोघरी शीरखुरमा बनविण्यात आला.दिवंगतांना घरात राहूनच केली दुआईद-उल-अजहाच्या पर्वावर मुस्लिम बांधव नमाज पठणानंतर कब्रस्तानात जाऊन दिवंगतांसाठी दुआ मागतात. त्यांच्या कबरीवर फातेहा पठण करतात. परंतु यंदा कोरोनामुळे दिवंगतांसाठी घरातूनच दुवा करण्यात आली.
नागपुरात उत्साह पण साधेपणाने साजरी झाली ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 00:09 IST
शहरात ईद-उल-अजहा उत्साहाबरोबरच साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून सुरक्षित अंतर पाळले.
नागपुरात उत्साह पण साधेपणाने साजरी झाली ईद
ठळक मुद्दे घरातच केले नमाज पठण : देशाच्या सुरक्षेसाठी मागितली दुआ