शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

बचत गट प्रदर्शनातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न

By admin | Updated: January 29, 2017 02:01 IST

‘बचत गट’ हा सर्वांनी मिळून चालविला जातो. यामुळे एकजुटीची भावना निर्माण होते. त्यातून एकमेकांना

महिला कारागिरांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन नागपूर : ‘बचत गट’ हा सर्वांनी मिळून चालविला जातो. यामुळे एकजुटीची भावना निर्माण होते. त्यातून एकमेकांना सहकार्य केले जाते. परस्परांबद्दल विश्वास निर्माण होतो. यातच या गटातील महिला कारागिरांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन हे महिला सक्षमीकरणाचा एक प्रयत्न आहे, असे विचार उत्कर्ष गृहिणी संस्था नागपूर व ‘नाबार्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. भगवाननगर ग्राऊंड धनश्री सभागृहासमोर, बॅनर्जी ले-आऊट येथे ग्रामीण व शहरातील बचत गटातील महिला कारागिरांच्या उत्कृष्ट वस्तू व कलाकृतीला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन भंडाऱ्याचे आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक मैथिली कोवे, वास्तुविशारद रवींद्र राजूरकर, लायन्स क्लबचे गोविंद निंबाळकर, नगरसेवक शरद बांते, नगरसेवक रमेश सिंगारे, मनोज गावंडे, उषा पांडे व उत्कर्ष गृहिणी संस्थेच्या अध्यक्ष मीना भागवतकर उपस्थित होते. आ. अवसरे म्हणाले, महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे हे प्रदर्शन स्वावलंबनाचे धडेही देते. अशा प्रदर्शनातून स्वत:चा आणि पर्यायाने समाजाचा विकास साधता येऊ शकतो. भविष्यात अशा प्रदर्शनात शेतकऱ्यांचाही समावेश करावा, असे आवाहनही त्यांनी केले. मैथिली कोवे म्हणाल्या, देशात सुमारे सात लाखांवर बचत गट आहेत. यात साधारण एक कोटी ४० लाख महिला कार्यरत आहेत. नागपूर जिल्ह्यात दरवर्षी ४०० ते ५०० महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. भविष्यात नागपुरातून धावणाऱ्या रेल्वेमध्ये या बचत गटांच्या माध्यमातून ‘वऱ्हाडी’ जेवण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थितांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक मीना भागवतकर यांनी केले. (प्रतिनिधी) सजावटीपासून खाद्यपदार्थांपर्यंत प्रदर्शनामध्ये ५० महिला बचत गट सहभागी झाले आहे. त्यांनी तयार केलेले कुंदनवर्क, मोतीवर्क, विविध डिझायनच्या साड्या, घरगुती सजावटीचे साहित्य, आकर्षक तोरण, डिझायनर कुर्ती, ज्यूटवर्क, मिरर आर्ट, आर्टिफिशियल दागिने, हॅन्डमेट दागिने, चामड्याचे साहित्य, कुशन वर्क यासह घरी तयार केलेले खाद्यपदार्थही उपलब्ध करून दिले आहे. ३१ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच मार्केटिंग, अकाऊंटिंग, प्रेझेंटेशन स्कील, उद्योजक कायदे, व्यक्तिमत्त्व विकास, शासकीय योजना आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाणार आहे.