हार्ट अटॅक टाळण्यासाठी करा योग्य पद्धतीने भोजन
By Admin | Updated: August 25, 2014 01:12 IST2014-08-25T01:12:55+5:302014-08-25T01:12:55+5:30
आहार हाच मोठा ईश्वर आहे. त्यामुळे आपण जिवंत राहतो. आहारापुढे कुठलेच औषध नसून हार्ट अटॅक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने खाण्याची प्रक्रिया शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबईतील सुप्रसिद्ध

हार्ट अटॅक टाळण्यासाठी करा योग्य पद्धतीने भोजन
मनु कोठारी : हृदय मित्र मंडळाचा १४ वा वर्धापनदिन उत्साहात
नागपूर : आहार हाच मोठा ईश्वर आहे. त्यामुळे आपण जिवंत राहतो. आहारापुढे कुठलेच औषध नसून हार्ट अटॅक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने खाण्याची प्रक्रिया शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबईतील सुप्रसिद्ध संशोधक डॉ. मनु कोठारी यांनी केले.
हृदय मित्र मंडळाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त गोकुळपेठच्या राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खगोलशास्त्राचे अभ्यासक, वैज्ञानिक डॉ. मधुकर आपटे उपस्थित होते. डॉ. मनु कोठारी म्हणाले, रुग्ण डॉक्टरकडे मोठ्या विश्वासाने जातात. वैद्यकीय आचारसंहितेत रुग्णाला मदत करणे डॉक्टरचे कर्र्तव्य आहे. परंतु बायपास सर्जरीबद्दल मेडिकल सायंसला काहीच नाही. आजकाल ९५ टक्के हृदयरुग्णांना बायपास, अँजिओग्राफी, अँजिओप्लॉस्टी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु आजाराला घाबरू नका. ४० टक्के हार्ट अटॅक दुखण्याशिवाय येत नाहीत. अशा वेळी डॉक्टरांनी रुग्णांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. वय झाल्यानंतर कॅन्सरचे मोठे कारण म्हणजे केमोथेरपी होय. लवकी ही हृदयरुग्णांसाठी अमृत आहे. हृदयरुग्णांना अँजिओप्लास्टी, बायपासने कुठलीच मदत होत नाही. जगात कुठेही बायपास, अँजिओग्र्राफी, अँजिओप्लॉस्टी करू नका. किमान ३० मिनिटे तरी शांतपणे, आनंदाने जेवण करण्यासाठी देण्याचा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आपटे यांनी हृदयात बिघाड होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे सांगूून दुुधी भोपळ््याचा वापर करून हृदयरोगापासून दूर राहण्याचे आवाहन केले. लवकीवर संशोधन करणारे मंगेश वांढरे यांनी लवकीचा हृदयरुग्णांना होणारा लाभ सांगितला.
लवकीवर संशोधन केलेले डॉ. रवि कळसाईत यांनी लवकीविषयी माहिती देताना लवकी तीन महिने सतत घेण्याचा सल्ला देऊन त्यापेक्षा अधिक काळ लवकी घेतल्यास पित्त वाढून अॅसिडीटी होण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त केले. लवकीवर केलेल्या संशोधनाबद्दल हृदय मित्र मंडळातर्फे त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आभार डॉ. के. जी. मिसर यांनी मानले. (प्रतिनिधी)