गुरुवार ठरला शिक्षा दिवस
By Admin | Updated: March 3, 2017 02:37 IST2017-03-03T02:37:25+5:302017-03-03T02:37:25+5:30
गुरुवार हा गुन्हेगारांसाठी शिक्षेचा दिवस ठरला. वेगवेगळ्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयांनी घरफोडी आणि चोरीच्या आठ गुन्ह्यांमध्ये तीन अट्टल चोरट्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

गुरुवार ठरला शिक्षा दिवस
तीन चोरट्यांना आठ गुन्ह्यात कारावास
नागपूर : गुरुवार हा गुन्हेगारांसाठी शिक्षेचा दिवस ठरला. वेगवेगळ्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयांनी घरफोडी आणि चोरीच्या आठ गुन्ह्यांमध्ये तीन अट्टल चोरट्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अन्य एका न्यायालयाने दुखापतीच्या गुन्ह्यात दोन जणांना कारावासाची शिक्षा सुनावली.
मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोधनी मार्गावरील लोकविहार सोसायटीत दोन ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आय. लोकवानी यांच्या न्यायालयाने एक वर्ष एक महिना सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अन्य एका आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयाने गुरुवारी या दोन्ही खटल्यांचा वेगवेगळा निकाल जाहीर केला.
व्यंकटी ऊर्फ बंटी मारोती दांडेकर (१९) आणि सूरज जयराम जाधव (१९) अशी आरोपींची नावे असून, ते कोराडी मार्गावरील श्रीकृष्णधाम झोपडपट्टीतील रहिवासी आहेत. बबलू अंबादास दांडेकर, असे निर्दोष सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या आरोपींनी पहिली घरफोडी ८ सप्टेंबर २०१५ रोजी सचिन वनवास मेश्राम (२८) यांच्याकडे करून आलमारीच्या लॉकरमधील १६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि १८ हजार रुपये रोख, असा एकूण ३४ हजाराचा ऐवज लंपास झालेला होता.