शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 19, 2024 21:15 IST

- पाम १५, तर सोयाबीन तेलात १० रुपयांची वाढ

नागपूर: केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातशुल्कात गेल्यावर्षी कपात केली. ही कपात मार्च-२०२५ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही देशात खाद्यतेलाचे दर कमी होण्याऐवजी १५ दिवसांपासून भडकले आहेत. सर्व खाद्यतेलात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याने स्वयंपाकघरातील फोडणी महागली आहे.होळी आणि रमजान महिन्यामुळे पाम तेलाचे दर मलेशिया देशातच महाग झाले आहेत. रमजान ईद साजरी होईपर्यंत दर कमी होण्याची शक्यता नाहीच. ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी होतील. पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम सर्व तेलाच्या दरवाढीवर झाल्याने लोकांना सध्यातरी जास्त दरातच खाद्यतेल खरेदी करावे लागेल, अशी शक्यता इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली. 

भारतात पाम तेलाची सर्वाधिक आयात होते. सध्या रमजान महिना असल्याने जगभरातील मुस्लीम देश मलेशियातून पाम तेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. त्यामुळे पाम तेलाचे दर जागतिक स्तरावर वधारले आहेत. या तेलामुळे अन्य खाद्यतेलाचे दरही वाढले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून दरवाढ सुरू असून मार्च अखेरपर्यंत राहील. त्यानंतर अर्थात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मलेशियात दर कमी होताच भारतातही खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.

आयात शुल्क कपातीचा तेलबियाच्या बाजारावर परिणामकेंद्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मार्च १५ रोजी अधिसूचना काढल्याने मार्च २०२५ पर्यंत कच्चे सोयातेल, पामतेल आणि सूर्यफुल तेलावर ५.५० टक्के आणि रिफाईंड तेलावर १३.७५ टक्के आयातशुल्क राहणार आहे. मागील हंगामात याच पातळीवर आयातशुल्क होते. त्यामुळे विक्रमी १६५ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती. आयात वाढल्याचा दबाव देशातील तेलाच्या भावावर झाला. पुढे असेच निर्णय होत राहिल्यास देशातील शेतकरी तेलबिया उत्पादनापासून परावृत्त होऊ शकतात. ही देशासाठी चिंतेची बाब होऊ शकते, असे तेल बाजारातील अभ्यासकांचे मत आहे. भारतात पाम तेलाची आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून होते. सोयातेलाची आयात अर्जंेटिना आणि ब्राझीलमधून, सूर्यफुल तेल रशिया आणि युक्रेन देशातून होते.

खाद्यतेल सध्या १५ दिवसांआधीसोयाबीन ११५ १०५पाम ११५ १००राईस ११२ १००सूर्यफूल ११५ १०५शेंगदाणा १७६ १७२मोहरी १३० १२०जवस १२० १२०वनस्पती १३० ११५

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूर