शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यात ‘ईडी’ ने दाखल केला एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 07:00 IST

राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या सिंचन महाघोटाळ्यात ईडी (प्रवर्तन निदेशालय) ने एफआयआर दाखल केला आहे. नागपूर व अमरावती विभागात वेगवेगळा एफआयआर केला आहे. यात एसीबीच्या नागपूर व अमरावती विभागाने दाखल केलेल्या ४० प्रकरणांचा समावेश आहे.

जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या सिंचन महाघोटाळ्यात ईडी (प्रवर्तन निदेशालय) ने एफआयआर दाखल केला आहे. नागपूर व अमरावती विभागात वेगवेगळा एफआयआर केला आहे. यात एसीबीच्या नागपूर व अमरावती विभागाने दाखल केलेल्या ४० प्रकरणांचा समावेश आहे. ईडीने अतिशय गोपनीयता बाळगली. कोरोनाचा प्रकोप संपताच ईडी सिंचन घोटाळ्याची मुळे पुन्हा खोदणार आहे. ईडीने एफआयआर केल्याने लोकमतने १५ जानेवारीला दिलेल्या वृत्ताची पुष्टी मिळाली आहे.सिंचन घोटाळ्यात राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची भूमिका राहिली आहे. २०१२ मध्ये एका जनहित याचिकेत ७० हजार कोटीचा घोटाळा करण्यात आल्याचा दावा केला होता. तत्कालीन फडणवीस सरकारद्वारे न्यायालयात दिलेल्या आश्वासनानंतर एसीबीकडे या प्रकरणाची चौकशी सोपविली होती. नागपूर व अमरावती एसीबीने एसआयटी गठित करून चौकशी केली होती. नागपूर एसीबीने २९ तर अमरावती एसीबीने १२ प्रकरणात गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात २०० कोटी रुपयांची हेराफेरी झाली होती. यात सिंचन विभागाचे अधिकारी, ठेकेदारासह १०० हून अधिक आरोपी होते. पण कुठल्याही आरोपींना अटक झाली नाही. न्यायालयात जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान एसीबीचे तत्कालीन डीजी संजय बर्वे यांनी २६ नोव्हेंबर २०१८ ला शपथपत्र सादर करून सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्याकडे बोट दाखविले होेते. त्यांना मंत्री असताना अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांसदर्भात जबाबदार असल्याचा शपथपत्रात उल्लेख होता. विधानसभा निवडणुकीनंतर २३ नोव्हेंबर २०१९ ला फडणवीस सरकार अल्पकाळात सत्तेत आले. अजित पवार तीन दिवसांसाठी उपमुख्यमंत्री बनले. त्याचवेळी एसीबीने ९ प्रकरणांची चौकशी बंद करून अजित पवार घोटाळ्यात जबाबदार नाहीत, असे शपथपत्र न्यायालयात सादर केले होते. तीन दिवसानंतर २६ नोव्हेंबर २०१९ ला फडणवीस सरकार पडल्यानंतर २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नव्या सरकारचे गठण झाले, ज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत.१९ डिसेंबर २०१९ ला एसीबीचे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंग यांनी न्यायालयात एसीबीद्वारे ९ प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आल्याच्या शपथपत्राला योग्य ठरविले. सिंह यांनी एक पाऊल पुढे टाकत पवार यांच्याविरुद्ध टीका करणाऱ्या तत्कालीन महासंचालक संजय बर्वे यांच्या भूमिकेवर नकारात्मक टिप्पणी केली होती. त्यानंतर एसीबीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सत्तेच्या खेळात एसीबीच्या भूमिकेमुळे दिल्लीतील राजकारण सक्रिय झाले होते. दिल्लीने ईडीला सक्रिय केले. तीन महिन्यापासून ईडी सिंचन घोटाळ्याचे विश्लेषण करीत होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत दोन एफआयआर दाखल केले. एकात नागपूर एसीबीचे २८ व दुसऱ्या एफआयआरमध्ये अमरावती एसीबीच्या १२ प्रकरणांचा समावेश होता. एसीबीचे वरिष्ठ अधिकारी तीन महिन्यापासून ईडीच्या कार्यप्रणालीवर नजर ठेवून होते. ईडी द्वारे एफआयआर केल्याची माहिती मिळाल्यामुळे एसीबीमध्ये खळबळ उडाली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पदसूत्रांच्या नुसार ईडी या प्रकरणात पोलीस विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याबाबतीत संतप्त आहे. वरच्या पदावर जाण्यासाठी या अधिकाऱ्याने त्याला मिळालेल्या आदेशाचे डोळे मिटून पालन केले. त्याला ईडीद्वारे चौकशी सुरू करण्यात आल्याची भणक लागल्यामुळे तो सतर्क झाला होता. त्याने चौकशीत सहकार्य न करता, त्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा आधिकारी सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या चौकशीशी जुळलेल्या एका प्रकरणात त्याची भूमिका संशयास्पद राहिली आहे. या प्रकरणाचीही सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती, परंतु ते प्रकरण नंतर दाबण्यात आले. ईडी या अधिकाऱ्याच्या भूमिकेचीही चौकशी करणार आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय