आर्थिक गैरव्यवहार, आरोपीला जामीन
By Admin | Updated: July 14, 2015 03:04 IST2015-07-14T03:04:33+5:302015-07-14T03:04:33+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला

आर्थिक गैरव्यवहार, आरोपीला जामीन
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला आहे. जयंत तोलानी असे आरोपीचे नाव असून तो २००६ ते २००८ पर्यंत हिंदी सिंधी सहकारी संस्थेचा सचिव होता. संस्थेत १९९९ ते २००८ या काळात ४ कोटी १७ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. पाचपावली पोलिसांनी तोलानीसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. तोलानीला गेल्या १५ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपीतर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर व अॅड. पंकज नवलानी यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)