मोगरकसा तलावालगत उभारणार इको टुरिझम कॉम्प्लेक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST2021-01-04T04:08:03+5:302021-01-04T04:08:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोगरकसा या संरक्षित जंगलातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूर वनविभागाने पुढाकार घेतला आहे. मोगरकसा तलावावर ...

An eco-tourism complex will be set up near Mogarkasa Lake | मोगरकसा तलावालगत उभारणार इको टुरिझम कॉम्प्लेक्स

मोगरकसा तलावालगत उभारणार इको टुरिझम कॉम्प्लेक्स

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मोगरकसा या संरक्षित जंगलातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूर वनविभागाने पुढाकार घेतला आहे. मोगरकसा तलावावर इको टुरिझम कॉम्प्लेक्स विकसित करण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून सलाई ते बावनथडी हा सफारी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. नव पर्यटकांसाठी वन विभागाने नववर्षासाठी दिलेली भेट आहे.

नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ प्रभु नाथ शुक्ला यांनी या इको टुरिझम कॉम्प्लेक्सची संकल्पना केली आहे. पवनी रेंज अंतर्गत येणारे मोगरकसा राखीव जंगल १६ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. हे मिश्रित वन असून सागवान, तेंदू, बांबू, सलाई आणि अन्य प्रजातींची झाडे यात आहेत. या सोबत, वाघ, बिबट्या, अस्वल, हरण, सांबर, जंगली कुत्री आदी प्राण्यांचा देखिल या जंगलात वावर आहे.

आगामी इको टुरिझम प्रकल्पमागील उद्दिष्टाबद्दल शुक्ल म्हणाले, मोगरकसा परिसर अनेक वर्षांपासून पर्यटनस्थळ म्हणून लोकांमध्ये चर्चेत आहे. असे असूनही त्या जागेवर आणि उभारणीकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होते. या भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे यासाठी हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.

...

१.८० कोटींचा प्रकल्प

या प्रकल्पाची किंमत १ कोटी ८० लााख रुपये आहे. यापैकी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी २० लाख रुपये मिळाले आहेत. उभारल्या जाणाऱ्या या पर्यटन संकुलात एकूण सहा एलिव्हेटेड विना वातानुकूलित तंबू असून ते मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तंबू वातानुकूलित नसतील परंतु भविष्यात ते वातानुकूलितमध्ये रुपांतरित करण्याची योजना आहे. हा प्रकल्प संयुक्त वन व्यवस्थापन समिती, सालई मार्फत चालविला जाईल.तंबू, डेक, पार्किंगचे क्षेत्र, लँडस्केपींग, उपाहारगृह, वॉच टॉवर, निसर्गमार्ग, सौर कुंपण या सुविधा यात असतील.

...

पेंचवरील ताण कमी होणार

या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनावरील दबाव कमी होणे देखील अपेक्षित आहे. सध्या पेंचवर पर्यटनाचा मोठ्या प्रमाणावर दबाव आहे. यामुळे बरेचदा पर्यटकांना निराश व्हावे लागते. मोगरकसा तलावावरील इको टुरिझम काॅम्प्लेक्सच्या उभारणीमुळे पर्यटकांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यातून वन विभागाचे उत्पन्नही वाढणार आहे.

......

Web Title: An eco-tourism complex will be set up near Mogarkasa Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.