शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘ई-बुक्स’ने जपलीय आधुनिक वाचनसंस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:25 IST

अगोदरच्या पिढ्यांना घडविणारे व त्यांच्यावर संस्कार करणारे ‘श्यामची आई’ असो किंवा हसविता हसविता मनातील हळव्या कोपऱ्याला स्पर्श करणारे ‘व्यक्ती आणि वल्ली’ असो. ‘मृत्युंजय’मधील दानवीर कर्णाची अगतिकता असो, महात्मा गांधींचा सत्याचा ठेवा. या पुस्तकांनी केवळ संस्कार दिले नाहीत, तर वाचनाची एक संस्कृती घडविली. अनेक दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारी ही पुस्तके आधुनिक काळात वाचली जाणार नाहीत, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र तंत्रज्ञान क्रांतीमुळे आज ही पुस्तके थेट तरुणाईच्या ‘टॅब’ व ‘मोबाईल’मध्ये आलेली आहेत.

ठळक मुद्देनागपुरातील तरुणाईची ऑनलाईन पुस्तकांना पसंती : ‘टॅब’, मोबाईलवर सुरू आहे वाचन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगोदरच्या पिढ्यांना घडविणारे व त्यांच्यावर संस्कार करणारे ‘श्यामची आई’ असो किंवा हसविता हसविता मनातील हळव्या कोपऱ्याला स्पर्श करणारे ‘व्यक्ती आणि वल्ली’ असो. ‘मृत्युंजय’मधील दानवीर कर्णाची अगतिकता असो, महात्मा गांधींचा सत्याचा ठेवा. या पुस्तकांनी केवळ संस्कार दिले नाहीत, तर वाचनाची एक संस्कृती घडविली. अनेक दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारी ही पुस्तके आधुनिक काळात वाचली जाणार नाहीत, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र तंत्रज्ञान क्रांतीमुळे आज ही पुस्तके थेट तरुणाईच्या ‘टॅब’ व ‘मोबाईल’मध्ये आलेली आहेत.तरुणाई आणि वाचन यांचा तसा जीवाभावाचा संबंध. बदलत्या काळासोबत पुस्तकांचे हे हवेहवेसे रूप कुठेतरी मागे पडताना दिसून येत आहे. वाचनाला आजदेखील पर्याय नाहीच. मात्र वाचन तसेच ग्रहण करण्याची पद्धत निश्चितच बदलली आहे. आज पुस्तकांची जागा ‘ई-बुक्स’ने घेतली आहे. संगणक, लॅपटॉपदेखील आता मागे पडले असून, आता चक्क तळहातावर ‘टॅब्स’, मोबाईल यांच्या रूपाने पुस्तकांचा ठेवा जतन करण्यात येत आहे. नागपूरमधील तरुणाईतदेखील मोठ्या प्रमाणावर ‘ई बुक्स’चा ‘ट्रेन्ड’ दिसून येत आहे.नागपुरातील अभियांत्रिकी, एमबीए किंवा इतर महाविद्यालयांतून जर चक्कर टाकली तर हे चित्र तुम्हाला हमखास आढळून येईल. हल्ली वाचनालये किंवा पुस्तकांच्या दुकानांमध्ये तुलनेने कमी गर्दी दिसून येत असली तरी, उपराजधानीतील पुस्तक संस्कृती मात्र टिकून आहे. रेडिओची जागा ‘एलईडी’ टीव्हीने घेतली, संगणकाची जागा ‘टॅब्स’ने घेतली. अगदी त्याचप्रमाणे पुस्तकांची जागा ‘ई-बुक्स’ ने घेतली आहे. आज तरुण पुस्तके खरेदी करण्यासाठी बाजारात जात नाही तर केवळ एका क्लिकवर घरबसल्या हवे ते पुस्तक विकत घेण्याकडे त्यांचा कल आहे. त्यातल्यात्यात इंग्रजी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुस्तकांना तर प्रचंड प्रमाणात मागणी आहे. निरनिराळ्या वेबसाईट्सच्या माध्यमातून अतिशय कमी किमतीत पुस्तके उपलब्ध आहेत. अनेक पुस्तके तर निरनिराळ्या संकेतस्थळांवरून मोफत ‘डाऊनलोड’ करून वाचता येऊ शकतात.माहितीपर पुस्तकांना प्राधान्यकेवळ अवांतर वाचनासाठीच ‘ई-बुक्स’चा वापर करण्यात येतो असे मुळीच नाही तर गणित, भौतिकशास्त्र यासारखी शास्त्रे, इतिहास, अर्थशास्त्र, मेडिकल अगदी प्रत्येक अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके ‘ई-बुक्स’च्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यातल्यात्यात परीक्षेच्या काळात तर या पुस्तकांना फार मागणी असते व विद्यार्थ्यांचा खर्चदेखील वाचतो, अशी माहिती आॅनलाईन पुस्तकांच्या एका नामांकित कंपनीच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली. अगदी आयआयटी प्रवेशपरीक्षा ‘जेईई-मेन्स’साठीदेखील विद्यार्थी ‘ई-बुक्स’च्या माध्यमातून अभ्यास करताना दिसून येतात.मराठीलादेखील मागणी‘ई-बुक्स’ हे नाव घेतले की यात केवळ इंग्रजी पुस्तके जास्त प्रमाणात उपलब्ध असतील व मराठीसारख्या प्रादेशिक भाषांची पुस्तके मिळणार नाहीत, असा गैरसमज असतो. वि.स.खांडेकर, पु.ल.देशपांडे, रणजित देसाई, व.पु.काळे, आचार्य अत्रे, साने गुरुजी यांची पुस्तके आजदेखील वाचली जात आहेत. अनेक पुस्तकांची ‘पीडीएफ व्हर्जन’तर मोफत उपलब्ध आहेत. शिवाय या माध्यमातून नामवंत लेखकांसोबतच नवीन लेखकांची पुस्तकेदेखील थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत, अशी माहिती पुस्तक तज्ज्ञांनी दिली आहे. विज्ञानात आदर्श बनलेले ‘स्टीफन हॉकिंग’पासून ते युवापिढीच्या ‘मेट्रो’ कल्चरला हात घालणारे चेतन भगतचे ‘नॉव्हेल्स’ यांच्यासोबतच जुन्या पुस्तकांचे वाचन करताना तरुण दिसून येतात.मोबाईल क्रांती फायदेशीरसुरुवातीला केवळ संगणकापुरतीच मर्यादित असलेल्या ‘ई-बुक्स’चा प्रभाव मोबाईल क्रांतीमुळे आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. स्मार्टफोन आणि त्यातील निरनिराळ्या आधुनिक अप्लिकेशन्स व टचस्क्रीन सुविधेमुळे बसस्टॉपपासून ते थेट मॉलपर्यंत अगदी कुठेही सहजपणे आवडीचे पुस्तक वाचले जाऊ शकते. ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ मार्केटमध्ये तर या पुस्तकांना फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.र्ई-बुक्सचे फायदे-सहजतेने व कुठेही वाचनाची सोय-स्वस्त दरात सहज उपलब्धता-पुस्तके ठेवण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता नाही-कागदांची बचत व पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण-सर्व वयोगटांसाठी पुस्तकांची प्रचंड उपलब्धता-मोबाईलवरदेखील उपलब्ध

टॅग्स :libraryवाचनालयnagpurनागपूर