शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

दोनच वेळा खा, लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 09:52 IST

लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवायचे असेल तर कडक भूक लागण्याच्या दोन वेळाच जेवण करा असा अनोखा सल्ला ‘स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त अभियानाचे’ प्रमुख व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लातूरच्या जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला.

ठळक मुद्देडॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा सल्ला ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवायचे असेल तर कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा आणि त्या दोन वेळानाच जेवण करा. आपले जेवण ५५ मिनिटात संपवा. दोन जेवणाच्या मध्ये काहीही खाऊ नका. जेवताना शक्यतो गोड कमी खा किंवा टाळा व जेवणातील प्रथिने वाढवा, असा अनोखा सल्ला ‘स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त अभियानाचे’ प्रमुख व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लातूरच्या जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला.सप्तक प्रस्तुत व दालचिनी आणि पर्सिस्टंट यांच्या सहकार्याने रविवारी ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय आयुक्त अनुप कूमार, अभय जोशी, समीर बेंद्रे, विलास मानेकर व डॉ. जगन्नाथ दीक्षित उपस्थित होते. डॉ. दीक्षित म्हणाले, ‘दोन वेळा खा आणि वजन कमी करा’ या संकल्पनेवर सर्वप्रथम डॉ. श्रीकांत जिचकार यांनी १९९७ ते २००४ पर्यंत मोठी मोहीम राबवली होती. हा प्रयोग स्वत:वर केल्यामुळेच तीन महिन्यात माझे वजन आठ किलोंनी व पोटाचा घेर दोन इंचानी कमी झाला. ‘डाएट प्लॅनिंग’ द्वारे केला जाणारा हा फंडा मधुमेहाच्या रुग्णांसाठी मात्र नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत स्त्रियांच्या लठ्ठपणात जगात तिसराडॉ. दीक्षित म्हणाले, जगभरात लठ्ठपणा व मधुमेहाची समस्या वेगाने वाढत आहे. जगात पुरुषांमध्ये लठ्ठपणात भारताचा पाचवा तर स्त्रियांबाबत तिसरा क्रमांक लागतो. देशात २० वर्षांपुढील व्यक्तीमध्ये मधुमेहाचे प्रमाण ८.७ टक्के आहे. यापैकी निम्म्या रुग्णांना मधुमेह असल्याचे माहिती नसल्याचे वास्तव आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मेंदुतील रक्तस्राव व कर्करोग आदींचा धोका वाढतो. लठ्ठपणाला प्रतिबंध करता येतो. एकही पैसा खर्च न करता, डॉक्टरांकडे न जाता वजन कमी करता येऊ शकते. याच उपायने मधुमेहाचा प्रतिबंध देखील करू शकतो, असेही ते म्हणाले.डॉ. दीक्षित म्हणाले, रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढले की, शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. इन्सुलीनमुळे लठ्ठपणा येतो. शरीरात इन्सुलिन दोन प्रकारचे तयार होते. एक पायाभूत स्राव आणि दुसरे म्हणजे खाण्यामुळे होणारा स्राव. पायाभूत स्राव मध्ये १८ ते ३२ युनिट इन्सुलिन स्रवत असते. याला थांबवता येत नाही, मात्र खाण्यामुळे २८ ते ३२ युनिट स्रवणाऱ्या इन्सुलिनवर नियंत्रण आणता येते. कोणताही पदार्थ खाल्ला की शरीरात इन्सुलिन स्रवते. आहाराचे प्रमाण कितीही कमी जास्त असले तरी सारख्याच प्रमाणात इन्सुलिन स्रवते. विशेष म्हणजे, एकदा इन्सुलिन तयार झाल्यानंतर परत ५५ मिनिटे तयार होत नाही. म्हणूनच कोणत्याही दोन वेळा खाण्यासाठी पाळल्या तर त्या दोन वेळातच इन्सुलिन ‘सिक्रीट’ होऊ शकतो. रक्तातील इन्सुलिन लेव्हल कमी झाली की यकृतमधील ग्लायकोजनमधून ग्लुकोज रिलीज होत जाते. नंतर ‘फॅटी अ‍ॅसिड’ फॅट्सपासून निघते व त्यापासून ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने शरीरातील ‘फॅट्स’ नैसर्गिकपणे कमी होऊ लागतात व मनुष्याचे वजन आपोआप कमी होत जाते.

दोन जेवणाच्या मध्ये हे घ्याडॉ. दीक्षित म्हणाले, सर्वसाधारणपणे मनुष्याला भूक लागली, असे दोन वेळा होते. सकाळी ९ वाजता संध्याकाळी ६ वाजता किंवा दुपारी १२.३० वाजता आणि रात्री ८.३० वाजता अशा त्या वेळा असतात. आपण जर कटाक्षाने दोनच वेळा पाळल्या तर इन्सुलिन स्रवण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. या दोन जेवणाच्या मधे केवळ पाणी, पातळ ताक, बीन साखरेचा ग्रीन टी, ब्लॅक टी, नारळ पाणी, टोमॅटोच्या एक दोन फोडी खाता येईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्य