पूर्व विदर्भात तीन वर्षात ५,१६२ मृत बालकांचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:08 AM2020-02-28T11:08:22+5:302020-02-28T11:10:59+5:30

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०१७ मध्ये जन्माआधीच गर्भाशयात बाळाच्या मृत्यूंची (स्टिलबर्थ) १,९०९ प्रकरणे समोर आली होती. याची टक्केवारी १५.९ होती. २०१८ मध्ये प्रकरणे कमी होऊन १,६४४ वर म्हणजे १४.३ टक्क्यांवर आली.

In Eastern Vidarbha, the birth of 5,162 dead babies in three years | पूर्व विदर्भात तीन वर्षात ५,१६२ मृत बालकांचा जन्म

पूर्व विदर्भात तीन वर्षात ५,१६२ मृत बालकांचा जन्म

Next
ठळक मुद्देकेवळ चार टक्क्यानेच प्रमाण कमीउच्च रक्तदाब, अतिरक्तस्राव व मधुमेह ठरतेय कारण

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०१७ मध्ये जन्माआधीच गर्भाशयात बाळाच्या मृत्यूंची (स्टिलबर्थ) १,९०९ प्रकरणे समोर आली होती. याची टक्केवारी १५.९ होती. २०१८ मध्ये प्रकरणे कमी होऊन १,६४४ वर म्हणजे १४.३ टक्क्यांवर आली. २०१९ मध्ये हे प्रकरण आणखी कमी व्हायला हवे होते परंतु १६०९ वर स्थिरावले. एकूणच तीन वर्षात स्टिलबर्थचे प्रमाण केवळ चार टक्क्यानेच कमी झाले आहे. गेल्या तीन वर्षांत एकूण ५,१६२ मृत बालकांचा जन्म झाला आहे.
गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे गर्भाशयातच बाळाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अयोग्य जीवनशैलीने हे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी झालेले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बैठे काम, जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे लठ्ठपणा वाढून मधुमेह, हृदयरोगाचा आजार वाढले आहेत. शिवाय, गर्भवतीचे विविध आजार, गर्भारपणात उच्च रक्तदाब, अपस्माराचा झटका, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील अडथळे आदीमुळे ‘स्टिलबर्थ’चा धोका वाढला आहे.
एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात १४३८ स्टिलबर्थची प्रकरणे
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा व नागपूर या सहा जिल्ह्यांची तुलना केल्यास २०१७ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ४२८, २०१८ मध्ये ४५७ तर २०१९ मध्ये ५५३ अशी एकूण १४३८ प्रकरणे समोर आली. तर गडचिरोली जिल्ह्यात २०१७ मध्ये ५५७, २०१८ मध्ये ३८६ व २०१९ मध्ये ३६२ म्हणजे १३०५ स्टिलबर्थची नोंदणी झाली. या दोन जिल्ह्यांत ‘स्टिलबर्थ’ प्रकरणांची संख्या मोठी असतानाही आवश्यक त्या सोयी उपलब्ध नाहीत.
गर्भवतींनी धोक्याची चिन्हे ओळखायला हवी
हृदयरोग, उच्च रक्तदाब, नियंत्रित नसलेला मधुमेह, अति रक्तस्त्राव, कमी दिवसांची गर्भधारणा, वेगवेगळे जंतूसंसर्ग व गर्भवतीचे वय ४० पेक्षा जास्त ही धोक्याची चिन्हे आहेत. यामुळे ‘स्टिलबर्थ’ची शक्यता वाढते. यामुळे प्रत्येक गर्भवतीने डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्यावी.
-डॉ. चैतन्य शेेंबेकर,
स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ

Web Title: In Eastern Vidarbha, the birth of 5,162 dead babies in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य