पूर्व विदर्भात तिसऱ्या टप्प्यासाठी आले १,२८,८०० डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:21+5:302021-03-04T04:11:21+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला ...

In East Vidarbha, 1,28,800 doses were received for the third phase | पूर्व विदर्भात तिसऱ्या टप्प्यासाठी आले १,२८,८०० डोस

पूर्व विदर्भात तिसऱ्या टप्प्यासाठी आले १,२८,८०० डोस

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासून लसीकरणाला गर्दी होत आहे. परंतु नियोजन नसल्याने ज्येष्ठांचे हाल होत आहेत. यातच एकट्या नागपूर जिल्ह्यात ७,५६,२५७ ज्येष्ठ नागरिकांची संख्या असताना, पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी मंगळवारी कोविशिल्डचे ९७,९००, तर, कोव्हॅक्सिनचे ३०,९०० असे एकूण १,२८,८०० डोस उपलब्ध झाले आहेत. यात नागपूर जिल्ह्याच्या वाट्याला कोविशिल्डचे ४९,९०० डोस आले. याच डोसमध्ये हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर यांचा पहिला व दुसरा डोसही दिला जात आहे. यामुळे तुटवडा तर पडणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. १४ जानेवारी रोजी नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे १,१४,००० डोस आले. २० जानेवारी रोजी विभागासाठी याच लसीचे ९६,००० डोस आले, तर आज नागपूर जिल्ह्यासाठी ४९,९००, भंडारा जिल्ह्यासाठी ८७००, चंद्रपूर जिल्ह्यासाठी १०८००, गडचिरोली जिल्ह्यासाठी १२,८००, गोंदिया जिल्ह्यासाठी १०,६००, तर वर्धा जिल्ह्यासाठी ५१०० डोस आले. भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे पहिल्या टप्प्यात नागपूर मेडिकलला २००० डोस देण्यात आले. नंतर भंडारा, गडचिरोली व वर्धा मिळून २१ हजार ३००, तर आता तिसऱ्या टप्प्यात या तिन्ही जिल्ह्यांना मिळून २१,३०० डोस आले आहेत.

- आतापर्यंत मिळाले कोविशिल्डचे १,३३, ६०० डोस

नागपूर शहरात ३१ हजार ‘हेल्थ वर्कर’, तर दुसऱ्या टप्प्यात १५ हजार ‘फ्रंट लाईन वर्कर’चे लसीकरण सुरू आहे. १५ फेब्रुवारीपासून ‘बुस्टर डोस’ला सुरुवातही झाली. यात ७ लाखांवर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची व ४५ वर्षांवरील ‘को-मॉर्बिडिटीज’ असलेल्यांची भर पडणार आहे. परंतु लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यासाठी ‘कोविशिल्ड’चे ३५,६००, दुसऱ्या टप्प्यासाठी ३८,५००, तर तिसऱ्या टप्प्यासाठी ५९,५०० डोस, असे एकूण १,३३,६०० डोस आले. यातून किती वापरले गेले आणि किती शिल्लक, याचा डाटा सध्या तरी उपलब्ध नाही. परंतु लाभार्थ्यांच्या तुलनेत हे डोस फारच कमी असल्याचे दिसून येत आहे.

-कोव्हॅक्सिनचे आतापर्यंत ८,२०० डोस

‘कोव्हॅक्सिन’ची लस नागपुरात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात २०००, दुसऱ्या टप्प्यात ३०००, तर तिसऱ्या टप्प्यात ३२०० डोस मिळाले आहेत. परंतु येथे दोन सेंटर असून होणारी गर्दी पाहता, सेंटर व डोस वाढवून देण्याची गरज आहे.

Web Title: In East Vidarbha, 1,28,800 doses were received for the third phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.