‘सीए’मध्ये पूर्वा बत्रा देशात ३७ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:46+5:302021-02-05T04:43:46+5:30
नागपूर : ‘आयसीएआय’तर्फे (द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया) घेण्यात आलेल्या ‘सीए’ अंतिम वर्ष परीक्षेचे निकाल घोषित करण्यात ...

‘सीए’मध्ये पूर्वा बत्रा देशात ३७ व्या स्थानी
नागपूर : ‘आयसीएआय’तर्फे (द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया) घेण्यात आलेल्या ‘सीए’ अंतिम वर्ष परीक्षेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. नागपुरातील पूर्वा बत्रा व रेणुका ढिंगरा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पूर्वा अखिल भारतीय पातळीवर ३७व्या स्थानी असून रेणुकाला ४५वा क्रमांक मिळाला आहे. याशिवाय इतर सहा विद्यार्थ्यांनीदेखील अव्वल १५० विद्यार्थ्यांत स्थान मिळविले आहे. ‘आयसीएआय’तर्फे सखोल निकाल मिळालेले नसल्याने किती विद्यार्थ्यांना यश मिळाले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती ‘आयसीएआय’च्या नागपूर शाखेचे अध्यक्ष किरीट कल्याणी यांनी दिली.
परीक्षेत यश मिळावे यासाठी नियमित अभ्यास सुरू होता. आर्टिकलशीपदरम्यानच सर्व विषयांचा अभ्यास पूर्ण झाला होता. उर्वरित वेळात पूर्ण भर स्वअध्ययन व उजळणीवर होता, असे प्रतिपादन रेणुका ढिंगरा हिने केले.