शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

प्रत्येक कॉलेजला लावावी लागणार ५०० झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:56 IST

२०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देवृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्ड्यांचीही माहिती मागितलीडीटीईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे. ‘डीटीई’च्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी प्रत्येकी ५०० वृक्षांची लागवड करावी, असे निर्देश नुकतेच देण्यात आले आहेत. नागपूर विभागातील सर्व अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए व एमसीए संस्थांच्या प्राचार्यांना यासंदर्भातील पत्रदेखील पाठविण्यात आले आहेत.३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयांमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांची वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर ‘ग्रीन आर्मी’ म्हणून नोंदणी करायची आहे. याशिवाय वृक्षारोपणासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांबाबतचा अहवालदेखील सादर करायचा आहे. यासंदर्भात ‘डीटीई’ने २४ एप्रिल रोजीच सर्व महाविद्यालयांना पत्र लिहिले होते. मात्र बहुतांश जणांनी हे पत्र गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे विभागीय प्रभारी सहसंचालक डॉ.चंद्रशेखर थोरात यांनी सर्व महाविद्यालयांची पत्र लिहून यासंदर्भात विचारणा केली आहे. शासन तसेच महसूल विभागाकडून अहवालासंदर्भात वारंवार विचारणा होत आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी खड्ड्यांची माहिती संकेतस्थळावर ‘अपलोड’ करावी तसेच ‘डीटीई’ला सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत विभागाला २६ हजार ६०० झाडे लावायची आहेत. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाने ५०० झाडे लावावी, अशी सूचनादेखील डॉ.थोरात यांनी दिली आहे. केवळ लेखी माहिती न देता संबंधित वृक्षारोपणाची छायाचित्रेदेखील सादर करावीत तसेच सर्व संस्थांनी निर्देशांचे पालन करावे व पर्यावरण संवर्धनास मदत करावी, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.अगोदरच्या मोहिमांचे काय झाले ?२०१३ सालीदेखील राज्य शासनाच्या पुढाकारानंतर ‘डीटीई’ने सर्व महाविद्यालयांना प्रत्येक १०० वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्याचा अहवालदेखील महाविद्यालयांकडून मागविला होता. मात्र अनेक महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केले. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तसेच महाविद्यालयांनी लावलेल्यापैकी नेमके किती वृक्ष जगले याची माहितीदेखील उपलब्ध नाही.

टॅग्स :collegeमहाविद्यालय