शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ई-तिकीट रॅकेटचा भंडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:17 IST

केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाने वरुड येथील एका फोटो स्टुडिओमध्ये छापामार कारवाई करून ई-तिकिटाच्या काळाबाजाराचा भंडाफोड केला. या कारवाई ई-तिकीट संदर्भातील साहित्य जप्त करून, इंडियन रेल्वे अ‍ॅक्टच्या कलम १४३ अन्वये कारवाई केली. नरखेड येथील आरपीएफच्या ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या काळाबाजाराचा तपास सुरू आहे.

ठळक मुद्देआरपीएफने केली कारवाई : वरुडच्या फोटो स्टुडिओमध्ये छापा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय रेल्वे सुरक्षा दलाने वरुड येथील एका फोटो स्टुडिओमध्ये छापामार कारवाई करून ई-तिकिटाच्या काळाबाजाराचा भंडाफोड केला. या कारवाई ई-तिकीट संदर्भातील साहित्य जप्त करून, इंडियन रेल्वे अ‍ॅक्टच्या कलम १४३ अन्वये कारवाई केली. नरखेड येथील आरपीएफच्या ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या काळाबाजाराचा तपास सुरू आहे.ई-तिकीटची सुरू असलेल्या काळाबाजारासंदर्भात मिळालेल्या गुप्त सुचनेनुसार आरपीएफची नागपूर टीम व नरखेडच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. यात आरपीएफच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, कॉन्स्टेबल दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीलकंठ गोरे व नरखेडचे कॉन्स्टेबल नसीरखान पठाण, सुरेंद्रनाथ यादव, अमित बारापात्रे, अश्विन पवार व अशोक सहभागी झाले होते. आरपीएफ कमांडट ज्योतिकुमार सतिजा यांच्या मार्गदर्शनात १७ आॅगस्टला सकाळी ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. पथकाने वरुड तालुक्यातील माँ फोटो स्टुडिओवर छापा टाकला. येथे ६०२८० रुपये किंमतीच्या २५ ई-तिकीट व बनावट ओळखपत्राच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ४४ तिकिटे जप्त करण्यात आली. याची किंमत १ लाख ५ हजार ७५८ रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर संगणक व काळाबाजाराशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. त्याची किंमत १ लाख ६६ हजार ३८ रुपये आहे. स्टुडिओचे संचालक रामगोपाल शर्मा (५१) याने मान्य केले की, काळाबाजार करून, गरजूंकडून अतिरिक्त पैसे घेऊन तिकीट उपलब्ध करून देण्यात येते. आरपीएफच्या नरखेड शाखेने फोटो स्टुडिओ संचालकाला अटक केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोरसकुमार यांच्या नियंत्रणात सुरू आहे.

 

 

टॅग्स :railwayरेल्वेonlineऑनलाइन