शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये होतोय आता ई-चालान स्कॅम ! नागरिकांची फसवणूक करणारे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज

By शुभांगी काळमेघ | Updated: June 9, 2025 19:27 IST

Nagpur : नागपूर सायबर पोलिसांनी या घोटाळ्याच्या तपासासाठी पाऊले उचलली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

शुभांगी काळमेघ नागपूर : नागपूरमध्ये आता सायबर फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. नागरिकांना फसवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट ई-चलन मेसेज पाठवले जात आहेत. नागपूर सायबर पोलिसांनी याबाबत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सायबर भामटे व्हॉट्सअ‍ॅपवर अज्ञात क्रमांकातून मेसेज पाठवतात. हा मेसेज परिवहन सेवा किंवा वाहतूक पोलिसांच्या नावाने बनावट ई-चलन असल्याचे सांगतो. त्यात वाहन क्रमांक, उल्लंघनाची माहिती आणि पेमेंट लिंक असते. परंतु, या लिंकवर क्लिक केल्यास एक APK (Android Package Kit) फाइल डाउनलोड होते, जी एक मालवेअर असते.

हा मालवेअर वापरकर्त्याच्या फोनमध्ये प्रवेश मिळवतो आणि संपर्क, संदेश, कॉल्स यासह SMS फंक्शनलिटीवर नियंत्रण मिळवतो. त्यानंतर, OTPs आणि इतर संवेदनशील माहिती Telegram चॅनेलवर पाठवली जाते. यामुळे बँकिंग अ‍ॅप्समध्ये प्रवेश मिळवून अनधिकृत व्यवहार होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी

  • अधिकृत लिंक वापरा: ई-चलन तपासण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाइट (https://echallan.parivahan.gov.in) वापरा.
  • APK फाइल्स टाळा: व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवलेल्या APK फाइल्स डाउनलोड करू नका.
  • अ‍ॅप परवानग्या तपासा: अॅप्सच्या परवानग्या तपासा आणि अनावश्यक परवानग्या रद्द करा.
  • अँटीव्हायरस वापरा: विश्वसनीय अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा आणि नियमितपणे अपडेट करा.
  • संदिग्ध मेसेजेसची माहिती द्या: सायबर पोलिसांना (https://cybercrime.gov.in) किंवा स्थानिक पोलिस स्थानकाला माहिती द्या
टॅग्स :nagpurनागपूरTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसfraudधोकेबाजी