शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:53 IST

कोणत्याही पार्श्वगायकाचा प्रभाव नसलेला युनिक गायक म्हणून हिंदी चित्रपट संगीतात गायक उदित नारायण यांची ओळख आहे. जाड आणि भरदार आवाज असूनही हळुवार संथपणाचा गोडवा रसिकांना कायम श्रवणानंद देणारा आहे. म्हणूनच ८० च्या दशकानंतर सर्व आघाडीच्या नायकांना आपला स्वर दिलेल्या या गायकाने रसिकांना प्रभावित केले आहे. ‘ऐ मेरे हमसफर..., तुमसे मिलना बाते करना..., आये हो मेरी जिंदगी मे..., ताल से ताल मिला..., ऐ अजनबी तू भी कभी..., पहला नशा...’ अशा कितीतरी गीतांमधील गोडवा रसिकांना आनंद देणारा आहे. त्यांच्या गीतांची जादू नागपूरकर रसिकांनी पुन्हा एकदा अनुभवली.

ठळक मुद्देरसिकांनी अनुभवली उदित नारायण यांच्या गीतांची मोहिनी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोणत्याही पार्श्वगायकाचा प्रभाव नसलेला युनिक गायक म्हणून हिंदी चित्रपट संगीतात गायक उदित नारायण यांची ओळख आहे. जाड आणि भरदार आवाज असूनही हळुवार संथपणाचा गोडवा रसिकांना कायम श्रवणानंद देणारा आहे. म्हणूनच ८० च्या दशकानंतर सर्व आघाडीच्या नायकांना आपला स्वर दिलेल्या या गायकाने रसिकांना प्रभावित केले आहे. ‘ऐ मेरे हमसफर..., तुमसे मिलना बाते करना..., आये हो मेरी जिंदगी मे..., ताल से ताल मिला..., ऐ अजनबी तू भी कभी..., पहला नशा...’ अशा कितीतरी गीतांमधील गोडवा रसिकांना आनंद देणारा आहे. त्यांच्या गीतांची जादू नागपूरकर रसिकांनी पुन्हा एकदा अनुभवली.बॉलिट्यून म्युझिकल एन्टरटेनर्स आणि हार्मोनी इव्हेन्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिट्स आॅफ उदित नारायण’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘व्हाईस आॅफ उदित नारायण’ म्हणून ओळखले जाणारे मयंक भोरकर व राजेश समर्थ यांची निर्मिती संकल्पना असलेल्या हा कार्यक्रम सुरेश भट सभागृह येथे नुकताच सादर करण्यात आला. अर्थातच उदित नारायण यांना मानवंदना देणाऱ्या या कार्यक्रमात मयंक भोरकर यांच्या स्वरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांना अक्षरश भारावून सोडले. उदित नारायण यांच्या आवाजाशी साधर्म्य असणाºया त्यांच्या स्वरांनी गाण्यात जीव ओतला. मयंक यांच्यासह स्वास्तिका ठाकरे यांनी ‘ओ पालनहारे...’ या गीताद्वारे कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे नारायण यांच्या सुरांची ही मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. ‘तु मेरे सामने..., ये बंधन तो प्यार का बंधन है..., अकेले है तो क्या गम है..., मै निकला गड्डी लेके..., ना जाने मेरे दिल को क्या..., टिप टिप बरसा पानी..., बिन तेरे सनम..., तु चिज बडी है मस्त मस्त..., मेहंदी लगा के रखना..., परदेसी परदेसी..., कहो ना प्यार है..., ऐसा देश है मेरा..., सुनो गौर से दुनिया वालो...’ या गीतांना रसिकांची दाद मिळाली. खास बॉलिवूडमधील खान तिकडीच्या चित्रपटांतील ‘तेरे नाम..., अकेले हम अकेले तुम..., कुछ कुछ होता है..., मुझे निंद ना आये..., दिल तो पागल है..., चांद छुपा बादल मे..., पापा कहते है बडा नाम करेगा...’ या गीतांना रसिकांचा वन्स मोअर मिळाला.यावेळी महेंद्र ढोले, परिमल वाराणशीवार, अमित हत्तीठेले, अक्षय हरले, श्रीकांत सूर्यवंशी, प्रसन्ना वानखेडे, रुग्वेद पांडे, राजेश धामणकर, राकेश वानखेडे, सुभाष वानखेडे या वाद्यकलावंतांनी सुरेल साथसंगत केली. निवेदन श्वेता शेलगावकर यांचे होते.

टॅग्स :Udit Narayanउदित नारायणmusicसंगीत