शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:28 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य आज आपल्याला जाणवत आहे. लवकरच हवेच्या बाबतीतही अशीच अवस्था निर्माण होणार आहे. कारण वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे टाळायचे असेल तर विकासाच्या नावावर झाडाच्या होणाऱ्या अवैध कत्तली थांबल्या पाहिजेत. नाहीतर या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने मातृपितृ कर्तव्यासारखेच पृथ्वी कर्तव्य म्हणून एक झाड लावले पाहिजे, असे मत माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमाजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर : डॉ. मोहन धारिया स्मृती पर्यावरण पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याचे दुर्भिक्ष्य आज आपल्याला जाणवत आहे. लवकरच हवेच्या बाबतीतही अशीच अवस्था निर्माण होणार आहे. कारण वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे टाळायचे असेल तर विकासाच्या नावावर झाडाच्या होणाऱ्या अवैध कत्तली थांबल्या पाहिजेत. नाहीतर या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने मातृपितृ कर्तव्यासारखेच पृथ्वी कर्तव्य म्हणून एक झाड लावले पाहिजे, असे मत माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.वनराई फाऊंडेशन नागपूर तर्फे डॉ. मोहन धारिया स्मृती पर्यावरण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवारी शंकरनगरातील धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. विकास सिरपूरकर यांच्याहस्ते ऋतुध्वज ऊर्फ बाबा देशपांडे व प्रा. अलोक शेवडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाबुराव तिडके, प्रमुख अतिथी नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्यासह अनंतराव घारड, समीर सराफ, अजय पाटील, अनिल राठी, विकास खिंचा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. राकेश कुमार म्हणाले की, पर्यावरणाला आयुष्य समर्पण करण्याची वृत्ती राहिलेली नाही. त्यामुळे हजारो वर्षापासून जी इकोसिस्टीम बनलेली आहे, ती नष्ट होत आहे. परंतु शासनाने आता त्याला गंभीरतेने घेतले आहे. कुठल्याही प्रकल्पाच्या निर्मितीपूर्वी जसा गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला जातो. तसा तेथील इकोसिस्टीमचाही अहवाल मागविला जातो. प्रसंगी बाबुराव तिडके म्हणाले की, एकीकडे झाडे जगविण्याची जी धडपड बाबा देशपांडे करीत आहे, दुसरीकडे वन नष्ट केली जात आहे. त्याचे परिणाम आपण भोगतो आहे. सत्काराला उत्तर देताना प्रा. आलोक शेवडे म्हणाले की, कीटकांचे सौंदर्यात्मक बाजू मांडणे माझा छंद आहे. कीटकाने मला जगाच्या पाठीवर पाऊल ठेवण्याची संधी दिली आहे. बाबा देशपांडे यांनी वृक्षाचे संवर्धन ही माझी पॅशन आहे. ७३ वर्षाचा असतानाही वनराईच्या मिळालेल्या साथीमुळे आणखी काम करायचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.

टॅग्स :Earthपृथ्वीVanraiवनराई