शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींचे डस्टबिन गेले चोरीला ! रस्त्यावर साचताहेत कचऱ्याचे ढीग, नागपुरात लावले होते तब्बल १२०० डस्टबिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 20:18 IST

Nagpur : स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न दाखवत महापालिकेने दोन वर्षापूर्वी मोठ्या थाटात बसवलेले स्टेनलेस स्टीलचे डस्टबिन आता रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ व सुंदर शहराचे स्वप्न दाखवत महापालिकेने दोन वर्षापूर्वी मोठ्या थाटात बसवलेले स्टेनलेस स्टीलचे डस्टबिन आता रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत. तब्बल २ कोटी २१ लाख ४० हजार रुपये खर्च करून शहरभर उभारलेल्या १२०० कचरापेट्यांपैकी बहुतांश ठिकाणी आज फक्त लोखंडी स्टैंड उभे दिसत आहेत. डस्टबिन नाहीत, पण त्याच जागी कचऱ्याचे ढीग मात्र पुन्हा वाढू लागले आहेत.

सिव्हिल शहरातील लाइन्स, वेस्ट हायकोर्ट रोड, सक्करदरा, मानेवाडा, खामला अशा अनेक भागांत डस्टबिनची वाताहत झाली आहे. डस्टबिन गायब झाल्याने नागरिक त्याच ठिकाणी कचरा फेकत असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांपुढे नवे आव्हान उभे झाले आहे. संपूर्ण शहरातील ९९ टक्के कचरापेट्या चोरीला गेल्या फक्त त्याचे स्टँड दिसत आहे. काही दिवसांनी हे स्टैंडसुद्धा गायब होतील.

"एखादी कचरापेटी चोरी गेली हे समजू शकते, पण संपूर्ण शहरातील कचरापेट्या चोरी जाणे म्हणजे कुंपणच शेत खाते अशी अवस्था झाली आहेत. कित्येक तक्रारी केल्या, पण प्रशासन लक्ष देत नाही व कोट्यवधी रुपयांच्या कचरापेट्या चोरी जातात, पण चौकशी होत नाही. आतापर्यंत शहरात नगरसेवक नव्हते. आता नवीन नगरसेवक यांनी हा ज्वलंत प्रश्न सभागृहात उपस्थित करावा व चोर कोण हे पुढे आणावे."- विलास ठोसर, सहसचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नागपूर 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur's Two Crore Rupee Dustbins Vanish; Garbage Piles Up!

Web Summary : Nagpur's stainless steel dustbins, costing ₹2 crore, have mysteriously disappeared, leaving only stands and increasing garbage piles. Citizens and activists are frustrated by the lack of action and demand an investigation into the missing bins.
टॅग्स :nagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका