धुळीत नागपूर!
By Admin | Updated: July 16, 2016 02:55 IST2016-07-16T02:55:39+5:302016-07-16T02:55:39+5:30
स्मार्ट सिटीचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र चार महिन्यापूर्वीचे बांधण्यात आलेले रस्ते उखडले आहेत.

धुळीत नागपूर!
नागरिकांचे आरोग्य अडचणीत वाहनांना गिट्टीचा मारा स्मार्ट सिटी होणार कशी ?
नागपूर : स्मार्ट सिटीचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र चार महिन्यापूर्वीचे बांधण्यात आलेले रस्ते उखडले आहेत. रस्त्यावरील धुळीमुळे नागपूरकरांचे आरोग्य अडचणीत आले आहे. यासोबतच गिट्टीचा मारा वाढल्याने वाहनांना फटका बसतो आहे. पालिका प्रशासनाने चालविलेली ही ‘धूळ’धाण कधी थांबणार, असा सवाल नागपूरकरांकडून केला जात आहे.
रस्त्यावरील वाढत्या धुळीचा आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्ध सर्वात जास्त बळी पडत आहेत. धुळीमुळे सर्दी-पडसेच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
-डॉ. देवेंद्र माहुरे, ईएनटी तज्ज्ञ
रस्त्यावरील धूळ व प्रदूषणामुळे दमासदृश आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ज्यांना अस्थमा आहे त्यांनी तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. धुळीमुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते. परिणामी अॅलर्जिक अस्थमा, हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनायटीज व सिलीकोसिस असे दमासदृश आजार होतात.
-डॉ. एस .व्ही. घोरपडे
विभाग प्रमुख, छाती व क्षयरोग विभाग मेडिकल