भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:09 IST2021-09-11T04:09:28+5:302021-09-11T04:09:28+5:30

सावनेर : घरासमाेर मैत्रिणींसाेबत गप्पा करीत असताना माेटरसायकलवर आलेल्या एकाने महिलेच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत पळ काढला. ही ...

During the day, he snatched the mangalsutra from the woman's neck | भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले

सावनेर : घरासमाेर मैत्रिणींसाेबत गप्पा करीत असताना माेटरसायकलवर आलेल्या एकाने महिलेच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत पळ काढला. ही घटना सावनेर शहरातील नाईक ले-आऊटमध्ये शुक्रवारी (दि. १०) दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली.

दीपा उत्सल सुपले, रा. नाईक लेआऊट, सावनेर या शिक्षिका आहेत. त्या मैत्रिणींसाेबत गाैरी विसर्जन करून घरी परत आल्या आणि घरासमाेर गप्पा करीत उभ्या राहिल्या. काही वेळाने माेटरसायकलवर आलेल्या अनाेळखी तरुणाने त्यांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत लगेच पळ काढला. त्या अडीच ताेळे वजनाच्या मंगळसूत्राची जुनी किंमत ७२ हजार रुपये असून, आजच्या बाजारभावाप्रमाणे ते १ लाख २५ हजार रुपयांचे आहे, अशी माहिती दीपा सुपले यांनी पाेलिसांना दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि ३९२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे करीत आहेत.

Web Title: During the day, he snatched the mangalsutra from the woman's neck