लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात वाहनधारकांसाठी चिंताजनक बाब समोर आली आहे. शहरातील काही भागांमध्ये कार व दुचाकींसाठी वापरल्या जाणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या बनावट इंजिन ऑइलची खुलेआम विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे नागपूरकरांच्या वाहनांच्या इंजिनला मोठा धोका निर्माण झाला असून, आर्थिक नुकसानही होत आहे.
शहरातील ऑटोमोबाइल मार्केट, गॅरेज, रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने तसेच काही ऑनलाइन माध्यमांतूनही डुप्लिकेट ऑइलची विक्री केली जात आहे. हे बनावट ऑइल दिसायला अगदी नामांकित कंपन्यांच्या पॅकिंगसारखेच असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची सहज फसवणूक होत आहे.
कंपनीचे लोगो, सील, बॅच नंबर आणि बारकोड यांची हुबेहूब नक्कल करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला जात आहे. काही विक्रेते कमी दरात ऑइल देण्याचे आमिष दाखवून कंपन्यांचे प्रोडक्ट्स ग्राहकांना आकर्षित करत 'ओरिजनलपेक्षा आहेत. स्वस्त' या कारणामुळे अनेकजण या जाळ्यात अडकत आहेत. विशेषतः दुचाकीचालक आणि व्यावसायिक वाहनचालक यांना याचा मोठा फटका बसत आहे.
बनावट इंजिन ऑइलचा कच्चा माल शहराबाहेरून येतो. मात्र, अनेकजण शहरातच ऑइल तयार करून त्यांचे पॅकेजिंग करतात. या बनावट ऑइलची विक्री करण्यासाठी शहरात विविध एजंट्सदेखील सक्रिय आहेत. त्यांच्या माध्यमातून केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातदेखील बनावट मालाचा पुरवठा होतो.
डुप्लिकेट ऑइलमुळे वाहनांना धोका
डुप्लिकेट ऑइलचा वापर केल्यास वाहनाच्या इंजिनचे आयुष्य कमी होते. इंजिन जास्त तापणे, आवाज वाढणे, मायलेज कमी होणे तसेच अचानक इंजिन जॅम होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अनेक वाहनधारकांनी नुकतेच ऑइल बदलल्यानंतरही इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तपासणीअंती वापरण्यात आलेले ऑइल बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
आंतरराष्ट्रीय ब्रँडचादेखील दुप्पल माल, थेट डिलिव्हरी
- नागपुरात तीन दिवसांअगोदर १ असाच एक प्रकार समोर आला. व्हॉल्व्होलिन या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या ऑइलचा दुप्पल माल विक्रीचे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणात वैभव सत्यपाल शिरसाट (१९, हिंगणा मार्ग, बन्सीनगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. लॅनसन्स नेटवर्क लिमिटेड या कंपनीकडून व्हॉल्व्होलिनच्या नावाखाली डुप्लिकेट मालाची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.
- विकल्या जात असल्याची नागपुरात दुप्पलचा माल व्यवस्थापक गौरव श्रीवास्तव यांना माहिती मिळाली. त्यांनी येऊन चाचपणी केली असता त्यात तथ्य असल्याचे आढळले. अंबाझरी पोलिस ठाण्यातील पथकाच्या मदतीने रामनगर चौकात वैभवला ताब्यात घेण्यात आले.
- त्याच्या गोदामात पाहणी केली असता तेथे चार ड्रममध्ये २२० लिटर बनावट ऑइल सापडले. आरोपी ते ऑइल बनावट पाकिटांमध्ये पॅक करून त्याची विक्री करत होता. आश्चर्याची बाब म्हणजे तो 'पोर्टर' या अॅपच्या माध्यमातून बनावट ऑइलची ग्राहकांना थेट डिलिव्हरी करत होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : Nagpur faces a surge in fake engine oil sales, endangering vehicles. Customers are tricked by counterfeit packaging and low prices. The oil, produced locally, damages engines, prompting complaints. An international brand racket was busted, revealing online deliveries.
Web Summary : नागपुर में नकली इंजन ऑयल की बिक्री बढ़ रही है, जिससे वाहनों को खतरा है। ग्राहक नकली पैकेजिंग और कम कीमतों से ठगे जा रहे हैं। स्थानीय रूप से उत्पादित तेल इंजन को नुकसान पहुंचाता है, जिससे शिकायतें बढ़ रही हैं। एक अंतरराष्ट्रीय ब्रांड रैकेट का भंडाफोड़, ऑनलाइन डिलीवरी का खुलासा।