ड्युप्लेक्समध्ये देहव्यापाराचा अड्डा
By Admin | Updated: May 22, 2014 18:30 IST2014-05-22T02:19:35+5:302014-05-22T18:30:08+5:30
गुन्हेशाखा पोलिसांनी कळमना मार्गावरील एच.बी. नगर येथील एका ‘ड्युप्लेक्स’मध्ये धाड टाकून येथे सुरू असलेल्या देह व्यापार्याचा अड्डा उघडकीस आणला.

ड्युप्लेक्समध्ये देहव्यापाराचा अड्डा
नागपूर : गुन्हेशाखा पोलिसांनी कळमना मार्गावरील एच.बी. नगर येथील एका ‘ड्युप्लेक्स’मध्ये धाड टाकून येथे सुरू असलेल्या देह व्यापार्याचा अड्डा उघडकीस आणला. या अड्डय़ाची प्रमुख सूत्रधार सीमा मिश्रा हिला पोलिसांनी अटक केली असून दोन तरुणींना मुक्त करण्यात आले.
सीमा ही एच.बी.नगर येथील एक ड्युप्लेक्स भाड्याने घेऊन राहते. तिचा पती खासगी बँकेत कलेक्शन एजंट म्हणून काम करतो. गुन्हेशाखेच्या सामाजिक विभागाला सीमाद्वारा देहव्यापार चालविला जात असल्याची माहिती मिळाली. मागील एक आठवड्यापासून पोलिसांची तिच्यावर नजर होती. बुधवारी दुपारी सीमाकडे एक बोगस ग्राहक पाठविण्यात आला. ग्राहकाने दोन तरुणींची मागणी केली. सौदा पक्का होताच दडून असलेल्या पोलिसांनी धाड मारून सीमाला पकडले. सूत्रांनुसार सीमा गेल्या एक वर्षांंपासून देहव्यापार करीत आहे. ग्राहक आल्यावर ती तरुणीला बोलावित असे.
साधारणपणे प्रत्येक ग्राहकाकडून दोन हजार रुपयांची मागणी केली जात होती. यापैकी हजार रुपये जागा उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात घेतले जात होते. तिच्या अड्डय़ावरून मिळालेली एक मुलगी घटस्फोटित असून दुसरी बेरोजगार आहे.
ही कारवाई उपायुक्त सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव गिरी, बी.एम. पवार, सहायक निरीक्षक बारापात्रे, पाटील, उपनिरीक्षक कोहळे, मदने, हवालदार पांडुरंग निकुरे, प्रकाश सिडाम, संजय तेलमासरे आदींनी केली. (प्रतिनिधी)