डम्परची सुमोला धडक; तिघे ठार
By Admin | Updated: July 18, 2014 01:03 IST2014-07-18T01:03:48+5:302014-07-18T01:03:48+5:30
कोळसा वाहून नेणाऱ्या डम्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा सुमोला जोरदार धडक देत फरफटत नेले. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

डम्परची सुमोला धडक; तिघे ठार
तिघे गंभीर जखमी : मकरधोकडा कोळसा खाणीतील घटना
उमरेड : कोळसा वाहून नेणाऱ्या डम्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा सुमोला जोरदार धडक देत फरफटत नेले. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये अभियंत्याचा समावेश आहे. ही घटना उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील खुल्या कोळसा खदानीतील वळणावर गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
अभियंता अशोक शामराव बुर्रेवार (५०, रा. नागपूर), प्रमोद शंकर नगराळे (४७, रा. ड्रीम सिटी, उमरेड) अशी मृतांची नाव असून, अजय खंगार, देवेंद्र सिंह व सुमोचा चालक राजू तुरातुरी अशी जखमींची नावे आहेत. बुर्रेवार हे बीईएमएल कंपनीमध्ये अभियंतापदी कार्यरत होते.
हे सर्व जण एमएच-४०/एन-७०३० क्रमांकाच्या टाटा सुमोने खुल्या खदानीमध्ये कामगारांना घेऊन जात होते. दरम्यान, मोठा व उंच डम्पर याच खदानीतून कोळसा घेऊन बाहेर येत होता. खदानीतील रत्याच्या वळणावर डम्परने सुमोला धडक दिली.
एवढेच नव्हे तर, ही सुमो अंदाजे १० फूट फरफटत नेली. धडक लागल्याचे लक्षात येताच अजय, देवेंद्र व राजू यांनी सुमोतून बाहेर उड्या टाकल्या. यात ते गंभीर जखमी झाले. मात्र, अभियंता बुर्रेवार व प्रमोद नगराळे या दोघांचा चिरडल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. तिन्ही जखमींना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. यांनी भेट दिली. दरम्यान, सायंकाळी वेकोलिचे महाव्यवस्थापक गुप्ता यांनी घटनास्थळाला भेट दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी एस. राजपूत, ठाणेदार संजय पवार, कॉन्स्टेबल रत्नाकर बमनोटे, सुधीर ज्ञानबोनवार व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना नागपूरला रवाना करून कारवाई पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)