विवेकानंद स्मारकामुळे नागपूरच्या वैभवात भर
By Admin | Updated: April 4, 2016 05:57 IST2016-04-04T05:57:14+5:302016-04-04T05:57:14+5:30
गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी अंबाझरी फ्लो पॉर्इंटवर स्वामी विवेकानंद यांची २१ फूट उंचीची मूर्ती

विवेकानंद स्मारकामुळे नागपूरच्या वैभवात भर
नागपूर : गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी अंबाझरी फ्लो पॉर्इंटवर स्वामी विवेकानंद यांची २१ फूट उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. मध्य भारतातील ही सर्वात उंच मूर्ती असून देशातील प्रसिद्ध मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांनी ती बनविली आहे. या भव्य मूर्तीमुळे नागपूरच्या वैभवात भर पडणार आहे.
या मूर्तीवर तीन कोटींचा खर्च करण्यात आला आहे. २१ फूट उंच मूर्ती व ३० फूट उंचीचा पॅडेस्टल यासह ५१ फूट उंची होणार आहे. स्मारक परिसराला सनसेट पॉर्इंट म्हणून ओळखले जाणार आहे. येथे म्युझिकल व लेझर फाऊं टेन उभारत तीन महिन्यात या परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. आॅगस्टपर्यत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. परंतु ११ सप्टेंबर १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी शिक ागो येथे भाषण केले होते. त्यामुळे ११ सप्टेंबरला या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. मार्च २०१३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु प्रस्ताव प्रलंबित होता. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्प मार्गी लागला. हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
चंद्रपुरातून आणली क्रेन
४राम सुतार यांचा मुलगा अनिल सुतार हे स्वत: मूर्तीसह नागपुरात पोहचले. ट्रेलरच्या साहाय्याने दोन दिवसापूर्वी ही मूर्ती कळमेश्वर येथे आणण्यात आली. परंतु भव्य मूर्ती उचलण्यासाठी लागणारी मोठी क्रेन मिळत नव्हती. त्यामुळे चंद्र्रपूर येथून १५० फु टाची क्रेन मागविण्यात आली. रविवारी सकाळी दयाशंकर तिवारी व विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत मूर्ती उतरवण्यात आली.
प्रकल्पाचे वैशिष्ट्ये
४मूर्तीसाठी ४ टन कांस्य (ब्र्रांझ)वापरण्यात आले.
४मूर्ती २१ फ्ूट उंच असून पॅडेस्टल ३० फूट उंचीचे आहे.
४गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती निर्माण करणारे राम सुतार यांनी ही मूर्ती बनविली आहे
४स्वामी विवेकानंद यांची देशात सर्वात उंच मूर्ती आहे.
४अंबाझरी ओव्हर फ्लो येथे मूर्ती स्थापित केली जाणार आहे.
तातडीने काम पूर्ण करणार
तीन महिन्यात स्मारकाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण केले जाईल. मूर्तीची स्थापना झाल्यानंतर कामाला गती येईल. आॅगस्टपर्यत काम पूर्ण करून लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
दयाशंकर तिवारी, सत्ता पक्षनेता