शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

अत्यल्प पर्जन्यमानामुळे वर्धा परिसरातील शेतकऱ्यांच्या ओलिताला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:56 IST

वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे.

ठळक मुद्देएका पिकावरच काम भागवावे लागले जनावरांचे स्थानांतरण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे. केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. अन्यत्र पाण्याअभावी दुष्काळाची परिस्थिती भिषणावह आहे. बोर सिंचन प्रकल्पाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या २५ ते ३० गावांमध्ये शेतातील विहिर आटल्या असून फेब्रुवारी महिन्यातच दर तासानंतर शेती पंपाद्वारे होत असलेले ओलित थांबवावे लागत आहे. गेल्या २५ वर्षांत असा प्रसंग यंदाच अनुभवावा लागत असल्याचे या भागातील दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वर्धा जिल्ह्यातील बोर सिंचन प्रकल्पा सर्वात जुना प्रकल्प आहे. १९५८ ते ६५ दरम्यान हा सिंचन प्रकल्प उभा करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत जवळपास २५ ते ३० गावांना पाणी शेतीसाठी दिले जाते. मात्र यावर्षी पावसाअभावी वर्धा जिल्ह्यातील सर्वच लघू व मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. या प्रकल्पामध्ये पाणी नसल्याने परिसरातील शेतातील विहिरींची पातळीही घसरली आहे. या भागात ओलिताची सोय असल्याने शेतकरी दुबार पीक घेत होते. यंदामात्र धरणाचे पाणी चना, व गहू पिकासाठी मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही पिकांचे क्षेत्र घटलेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिर आहे. त्या शेतकऱ्यांनी जवळील पाण्याच्या भरोश्यावर गहू लावला मात्र आता विहिरीचे पाणी तुटत असल्याने गव्हाच्या ओलितावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे यंदा धरण पट्ट्यातील अनेक गावात पिकाअभावी शेत रिकामे पडून आहे. तर धरणालगतच्या गावांमधून दुधाळू जनावरे घेऊन गवळी समाजाचे लोक दुसऱ्या गावात स्थानांतरीत होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तसेच या परिसरातील पाणी पुरवठा योजनाही प्रभावित झाल्या आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने बोरधरण भरले नाही. त्यामुळे रब्बी हंगामात गहू, चना पिकाला पाणी मिळाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीवरील पाण्याच्या भरोश्यावर गहू व चना पीक घेतले. त्यांनाही आता विहिरीची पाणी पातळी कमी झाल्याने ओलितावर फटका बसत आहे. दर तासानंतर मोटरपंप बंद करावे लागत आहे. व विहिरीला पाणी येण्याची वाट पहावी लागत आहे.अमीत सुधाकर माहुरे, शेतकरी, जाखाळा घोराड

टॅग्स :Farmerशेतकरी