शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सततच्या 'चेन पुलिंग'मुळे आठ महिन्यात १०७५ रेल्वेगाड्यांचा खोळंबा, ७९३ गुन्हे दाखल

By नरेश डोंगरे | Updated: December 9, 2023 00:58 IST

गेल्या सात महिन्यात अशाच प्रकारे रेल्वेची साखळी ओढली गेल्याने तब्बल १०७५ रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

नागपूर : आपतकालिन स्थितीत प्रवाशांना मदत व्हावी म्हणून रेल्वे गाडीची साखळी ओढण्याची (अलार्म चेन पुलिंग) व्यवस्था असते. मात्र, काही उपद्रवी मंडळी उठसुठ रेल्वेगाडची साखळी ओढत असल्याने त्याचा गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होत आहे. गेल्या सात महिन्यात अशाच प्रकारे रेल्वेची साखळी ओढली गेल्याने तब्बल १०७५ रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

आणीबाणीची स्थिती असल्यास रेल्वे गाडी थांबविता यावी म्हणून ट्रेनच्या प्रत्येक डब्यात साखळी (चेन) दिलेली असते. ती ओढल्यास ट्रेन थांबते. विनाकारण ही साखळी ओढू नये, अन्यथा दंड आणि कारावासाची शिक्षा होईल, असा स्पष्ट ईशारा बाजूला लिहून असतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत काही समाजकंटक विनाकारण चेन पुलिंग करतात. अर्थात चेन पुलिंगमुळे लोको पायलटला संकेत मिळते अन् तो ट्रेन थांबवितो. त्यानंतर नेमकी कुणी आणि कशासाठी चेनपुलिंग केली, त्याचे कारण शोधले जाते अन् किमान १० मिनिटानंतर ही ट्रेन पुढे निघते. अर्थात् या गाडीत चेन पुलिंग झाल्यामुळे आणि ती थांबल्यामुळे एकट्या तिच्या वेळापत्रकावर नव्हे तर त्या गाडीच्या मागून धावणाऱ्या अन्य सर्वच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.

नागपूर विभागात २४१ गाड्यांवर परिणामविनाकारण चेनपुलिंग झाल्याने एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात एकूण १०७५ गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. त्यापैकी मुंबई विभागात ३४४ मेल / एक्सप्रेस, भुसावळ विभागात ३५५, नागपूर विभागात २४१, पुणे विभागात ९६ तर सोलापूर विभागात ३९ गाड्यांवर परिणाम झाला. या सर्वच गाड्या विलंबाने धावल्या. त्यामुळे या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल, दंडही वसूलरेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये विनाकारण चेन पुलिंग करणे गुन्हा आहे. तो सिद्ध झाल्यास आर्थिक दंड किंवा कारावास किंवा दोन्ही शिक्षा संबंधित व्यक्तीला होऊ शकतात. मध्ये रेल्वेने गेल्या आठ महिन्यात अशा प्रकारे ७९३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आणि त्यांच्याकडून २.७२ लाखांचा दंडही वसूल केला. 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारी