लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रभाग ८ मोमिनपुरा येथील तकिया दिवानशहा परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शेकडो घरात कावीळचे रुग्ण वाढले आहेत. घराघरात कावीळचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संताप असून, बुधवारी हा संताप मोमिनपुऱ्यात अनुभवायला आला. महिलांनी रस्त्यावर येऊन मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.परिसरातील मो. तौकीर म्हणाले की, त्यांच्या घरात मोठा भाऊ मो. अतिक व मो. रफीक यांना कावीळ झाला आहे. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मशीद दारुल फलाहजवळ राहणाऱ्या आफरीन कौसर यांना कावीळ झाला आहे. मो. नसीर म्हणाले की, पाण्यातून दुर्गंधी येत आहे. घरातील १४ वर्षीय मुलाला कावीळ झाला आहे. अशा अनेक तक्रारी परिसरातील नागरिकांनी लोकमत पुढे व्यक्त केल्या. एमआयएमचे रिजवान अन्सारी म्हणाले की, दूषित पाणीपुरवठा ही संपूर्ण प्रभागाची समस्या आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधींची भूमिका मूकदर्शक बनली आहे.दोन महिन्यापासून दूषित पाण्याची समस्या