जमिनीच्या विक्रीत फसविले
By Admin | Updated: March 26, 2015 02:23 IST2015-03-26T02:23:15+5:302015-03-26T02:23:15+5:30
एकाच्या जमिनीचा सौदा करून, दुसऱ्याला जमिनीची विक्री केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी ४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीच्या विक्रीत फसविले
नागपूर : एकाच्या जमिनीचा सौदा करून, दुसऱ्याला जमिनीची विक्री केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी ४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे. उज्जयना दयाराम कांबळे, कल्पना कचरू चहांदे, कचरू श्रीपाद चहांदे व सुधीर गंगाधर वाघमारे अशी आरोपींची नावे आहे. ते वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील रहिवासी आहे. याप्रकरणातील आरोपी उज्जयना हिने तिच्या पतीच्या नावावर असलेल्या शेतजमिनीचा सौदा इरफान अली मगदुम अली सय्यद (३२) रा. खडकी, ता. सेलू याच्याशी केला. त्याच्याकडून १९.५१ लाख रुपये घेतले. आरोपींनी इरफानला कुठलीही माहिती न देता दुसऱ्याच व्यक्तीशी जमिनीचा करार केला. याप्रकरणी सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)