शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इनकमिंगमुळे भविष्यात भाजपाची काँग्रेस होईल :महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 20:52 IST

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील मातब्बर नेत्यांच्या भाजपात सुरू असलेल्या इनकमिंगमुळे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही. परिणामी भविष्यात भाजपाची काँग्रेस होईल. अशी शंका पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी व्यक्त केली.

ठळक मुद्देराष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील मातब्बर नेत्यांच्या भाजपात सुरू असलेल्या इनकमिंगमुळे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही. परिणामी भविष्यात भाजपाचीकाँग्रेस होईल. अशी शंका पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी व्यक्त केली.राष्ट्रीय समाज पक्षातर्फे बुधवार बाजार येथील संताजी सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळावा, ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपन कार्यक्रम प्रसंगी जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. विरोधीपक्ष सक्षम नाही. भाजपा घराणेशाही नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा एनडीएचीच सत्ता येईल. असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला दिलेला शब्द पूर्ण केला. पशुसंवर्धन विभागाचे बजेट आधी १२० कोटीचे होते. आता ते ७ हजार ५०० कोटींवर गेले आहे. विदर्भातील दूध उत्पादन दहा हजार लिटरवरून साडेचार लाखांवर गेले आहे. केंद्रातही स्वतंत्र पशुसंवर्धन विभाग निर्माण करण्यात आला. याचा विचार करता आम्हाला पुन्हा पाच वर्ष संधी मिळेल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. भाजपाकडे राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभेच्या ५७ जागांची मागणी केली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा द्यावी, यात नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदार संघाचा समावेश असल्याचे जानकर यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडयाप्रमाणे विदर्भातही राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.२५ ऑगस्टला राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षात सेलीब्रेटी प्रवेश करणार असून अभिनेते संजय दत्त यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती जानकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिली. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. मनोज साबळे होते. मंचावर आमदार सुधाकर देशमुख,खासदार कृपाल तुमाने राजूभाऊ पातकर, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड , श्रद्धा भ्रांताबेकर, अतुल पवार, सुभाष राजपूत, डॉ. स्वर्णिमा दिक्षित, अ‍ॅड दिपक सरक, गौतम गुंदेजा , आयोजक लोकेश रसाळ, सह आयोजक माधुरी पालीवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार मोहन मते यांनीही भेट दिली. यावेळी सुधाकर देशमुख, कृपाल तुमाने, आनंद मोहिते आदींनी मार्गदशंने केले. जानकर व मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ट नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरBJPभाजपाcongressकाँग्रेस