शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

परीक्षेपासून वंचित ठेवल्याने मुख्याध्यापकासह दोघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 21:34 IST

नवोदयमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकासह दोघांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला. हा प्रस्ताव आठ दिवसापासून सामान्य प्रशासनात अडकून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

ठळक मुद्देनवोदय प्रवेशपूर्व परीक्षा : शिक्षण विभागाकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवोदयमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकासह दोघांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला. हा प्रस्ताव आठ दिवसापासून सामान्य प्रशासनात अडकून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.नवोदयमध्ये प्रवेशासाठी पूर्वपरीक्षा होते. या करिता धानला येथील एका शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केला. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज केला. या अर्जासाठी येथील शिक्षिकेने ७० ते ८० रुपये विद्यार्थ्यांकडून घेतले. वेळेत प्रवेशपत्रही दिले नाही. प्रवेशपत्र मागण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी पालकांना घेऊन येण्याच्या सूचना केल्या. परीक्षेच्या दिवशी शिक्षिकेचा मोबाईल बंद होता. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान यामुळे झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रकार उपस्थित करीत चौकशीचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी संबंधित मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षिका यांच्याकडून खुलासा मागविला. खुलासा असमाधानकारक असल्याने दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला. आठ दिवसापूर्वीच हा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आला नाही.

टॅग्स :Teacherशिक्षकsuspensionनिलंबन