शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रविभवनातील कॅन्टीनमध्ये सिलिंडर लिकेजमुळे आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:10 IST

रविभवनातील कॅन्टीनच्या स्वयंपाकखोलीत गॅस सिलिंडरचे पाईप लिकेज होऊन लागलेल्या आगीत पोळ्या बनवीत असलेल्या तीन महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली.

ठळक मुद्देतीन महिला जखमी : मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :

प्रमिला बिवे (६०), विद्या गायकवाड (४०) आणि विजया शिरकर (४०), अशी जखमी महिलांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी तिन्ही महिला स्वयंपाक खोलीत फरशीवर बसून गॅसवर पोळ्या शेकत होत्या. सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून शेगडीला गॅस पुरवठा करणारा पाईप लिकेज असल्याने जळू लागला. लगेच आगीचा भडका उडाला. या आगीत प्रमिलाबाई काही टक्के जळाल्या तर विद्याबाईचा हात आणि विजयाचा पाय जळाला. आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाचे पथक गाडीसह घटनास्थळी पोहोचले. यानंतर कॅन्टीनच्या संचालकांनी जखमी महिलांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.कॅन्टीनचे संचालक निरंजन राव यांच्यानुसार, प्रमिलाबाई १५ टक्के जळाल्या तर इतर दोन्ही महिलांना साधारण जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी दिली. राव यांच्यानुसार एक मोठा अनर्थ टळला.दरम्यान मानव अधिकार संघटनेचे मिलिंद पौनीपगार यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी आम्ही रविभवनातच होतो. वरच्या माळ्यावर आमच्या संघटनेची मिटिंग सुरू होती. अपघात होताच मी व मिलिंद दहिवले, गजेंद्रसिंग, बलराम बारसे आदी तातडीने खाली आलो. वृद्ध महिला मोठ्या प्रमाणावर जळाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याबाबत मागणी करीत होतो. तेव्हा कॅन्टीनच्या संचालकांनी वाद घातला. ते फारसे गंभीर दिसून येत नव्हते. मग आम्ही जखमींना आॅटोत टाकून रुग्णालयात पोहोचविले.

टॅग्स :Ravi Bhavan, Nagpurरविभवन नागपूरfireआग