यास चक्रीवादळामुळे नागपूर मार्गे जाणाऱ्या १६ रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:20+5:302021-05-24T04:08:20+5:30

नागपूर : यास या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्यामुळे मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपूर मार्गे धावणाऱ्या १६ ...

Due to the cyclone, 16 trains passing through Nagpur were canceled | यास चक्रीवादळामुळे नागपूर मार्गे जाणाऱ्या १६ रेल्वेगाड्या रद्द

यास चक्रीवादळामुळे नागपूर मार्गे जाणाऱ्या १६ रेल्वेगाड्या रद्द

नागपूर : यास या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्यामुळे मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपूर मार्गे धावणाऱ्या १६ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओदिशा आणि बंगालच्या खाडीत यास या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टिकोणातून मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतून जाणाऱ्या १६ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान रद्द केलेल्या रेल्वेगाड्यात २४ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२२२१ पुणे-हावडा विशेष रेल्वेगाडी, २७ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२२२२ हावडा-पुणे विशेष रेल्वेगाडी, २४ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२८१८ पुणे-सांतरागाछी विशेष रेल्वेगाडी, २९ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२८१७ सांतरागाछी-पुणे विशेष रेल्वेगाडी, २४ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२७६७ नांदेड-सांतरागाछी, २६ मे रोजी ०२७६८ सांतरागाछी-नांदेड, २५ व २६ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४ हावडा-अहमदाबाद विशेष, २५ व २९ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक अहमदाबाद-हावडा विशेष रेल्वेगाडी, २५ व २६ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष रेल्वेगाडी, २४ व २८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा विशेष रेल्वेगाडी, २५ व २६ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२२८० हावडा-पुणे विशेष रेल्वेगाडी, २४ व २५ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक पुणे-हावडा विशेष रेल्वेगाडी, २५ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२९०६ हावडा-ओखा विशेष रेल्वेगाडी, ३० मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ओखा-हावडा विशेष रेल्वेगाडी, २६ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक ०२२६० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि २५ मे रोजी रेल्वेगाडी क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा विशेष रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. ऐनवेळी या गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने केले आहे.

..............

Web Title: Due to the cyclone, 16 trains passing through Nagpur were canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.