शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो व इंजिनिअरिंग क्लस्टरमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST

- क्लस्टर वर्षभरात प्रत्यक्ष सुरू होणार : एमआयडीसीमध्ये लघु व मोठे उद्योग येणार नागपूर : वर्षभरात सुरू प्रत्यक्ष सुरू ...

- क्लस्टर वर्षभरात प्रत्यक्ष सुरू होणार : एमआयडीसीमध्ये लघु व मोठे उद्योग येणार

नागपूर : वर्षभरात सुरू प्रत्यक्ष सुरू होणाऱ्या नागपूर ऑटो आणि इंजिनिअरिंग क्लस्टरमुळे हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वरसह अन्य औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योगांना ‘बूस्ट’ मिळणार आहे. एमएसई-सीडीपी योजनेंतर्गत एमएसएमई मंत्रालय, भारत सरकारने ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टर, नागपूरमध्ये सामायिक सुविधा केंद्राच्या (सीएफसी) स्थापनेसाठी मंजुरी प्रदान केली आहे.

क्लस्टरमध्ये ७१६ सूक्ष्म व लघु उद्योगांचा सहभाग

विदर्भातील पहिल्या क्लस्टरने एमआयडीसी हिंगणा व बुटीबोरीला बूस्ट मिळेल आणि रोजगारासह गुंतवणूक वाढेल. क्लस्टरमध्ये एकूण ७१६ सूक्ष्म आणि लघु उद्योगांचा सहभाग आहे. यामध्ये महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र, अशोक लेलँड, ऑर्डनन्स फॅक्टरी (नागपूर, चंद्रपूर, भंडारा), बोईंग, एमआरओ, डिसॉल्ट आदींसह अनेक मोठ्या उद्योगांकडून कंत्राट मिळालेल्या लघु उद्योगांना येथे जॉब करता येतील. या क्लस्टरमध्ये विविध उद्योगांद्वारे फॅब्रिकेशन, स्टील फर्निचर, एसपीएम ऑटो पार्ट आणि इंजिनिअरिंग उत्पादने, इलेक्ट्रिक इंजिन सेवा, मशीन, शीट धातू, नियंत्रण पॅनल येथे बनविता येतील. या केंद्रातील सुविधांमध्ये सीएनसी टर्मिनल सेंटर, व्हीएमसी-५ अ‍ॅक्सिस, वायर कट मशीन, लेझर कटिंग मशीन, टेस्टिंग लॅक, डिझाईन व डिझाईन प्रशिक्षण केंद्राचा समावेश राहील. याद्वारे उद्योगांना कमी रकमेत उच्च गुणवत्तेची सेवा मिळणार असल्याचे क्लस्टरचे संचालक नारायण गुप्ता यांनी सांगितले.

असे आहे क्लस्टर

सामायिक सुविधा केंद्रासाठी २०१३ मध्ये नागपूर ऑटो अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग क्लस्टर प्रा.लि. या कंपनीची स्थापना केली. क्लस्टरमध्ये १७.६३ कोटींची गुुंतवणूक होणार आहे. यामध्ये एकूण २४ जण असून, त्यात ९ संचालक आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी १० टक्के संचालकांनी गुंतवणूक केली आहे. यामध्ये १२.५ कोटींची मशीनरी केंद्र सरकार देणार असून, ३.५ कोटी राज्य सरकार आणि उर्वरित वाटा संचालकांचा आहे. क्लस्टरसाठी एमआयडीसीकडून दीड एकर जागा संचालकांनी खरेदी केली आहे. या जागेवर आठ महिन्यात इमारत उभी राहणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून १२ ते १५ मोठ्या मशीन बसविण्यात येणार आहेत.

एमएसई उद्योगात होणार वाढ

नारायण गुप्ता म्हणाले, क्लस्टरमध्ये सीएफसी स्थापनेने उद्योगात वाढ होईल. उत्पादकता, उलाढाल, रोजगार, निर्यात आणि उद्योगांची संख्या वाढेल. वार्षिक उत्पादकता ७ हजार मेट्रिक टनावरून ८,०५० मेट्रिक टनावर जाईल. तसेच क्लस्टर उलाढाल १३० कोटींवरून १६३ कोटींपर्यंत वाढेल. शिवाय प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारात वाढ होईल आणि कंपन्यांची संख्या ८५९ वर जाईल. सर्व ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टरच्या उद्योगांना जागतिकस्तरावर स्पर्धेत उतरण्यासह सीएफसीचा फायदा मिळेल. कारखान्यात मोठ्या मशीन्स ठेवू न शकणाऱ्या लघु उद्योगांना क्लस्टरमध्ये जाऊन जॉबवर्क करता येईल. त्यामुळे मोठ्या कंपन्या येथील लघु उद्योगांना काम देतील. असे क्लस्टर मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे आहे.

ऑटो इंजिनिअरिंग क्लस्टरचे भूमिपूजन

एमआयडीसी हिंगणा येथील सीएफसीचा शिलान्यास आणि भूमिपूजन रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी, एमएसएमई-डीआय नागपूरचे संचालक प्रशांत पार्लेवार, केंद्राचे संचालक नारायण गुप्ता, रमेश पटेल आणि उद्योगांचे संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.