अरुणोदय स्वप्नांचा
By Admin | Updated: January 2, 2016 08:37 IST2016-01-02T08:37:12+5:302016-01-02T08:37:12+5:30
प्रत्येक वर्षी नव्या वर्षाचे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो. कालौघात अनेकदा हे संकल्प सिद्धीस जात नाहीत. पण

अरुणोदय स्वप्नांचा
अरुणोदय स्वप्नांचा
प्रत्येक वर्षी नव्या वर्षाचे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो. कालौघात अनेकदा हे संकल्प सिद्धीस जात नाहीत. पण पुन्हा नव्या जोमाने आपल्या संकल्पपूर्तीसाठी आपण धडपडत राहतो. हा आशावाद कायमच मनात असतो. जुने वर्ष सरले आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस नवा आशावाद, नवी स्वप्ने घेऊन जन्माला आला. नववर्षारंभी बाळ जन्माला आले, घरी नवीनच आनंदाचे वातावरण तयार झाले. बच्चे कंपनीने शाळेत एकत्र येत आनंदोत्सव साजरा करीत पहिल्या दिवसापासून अभ्यास करून मोठे होण्याचा संकल्प केला. काहींनी कुटुंबीयासह उद्यानात जाऊन आनंद घेतला. तर अनेकांनी विविध मंदिरात निरामय आयुष्याची कामना केली. सकारात्मक संकल्प आणि आशावादाने नागपूरकरांचा पहिला दिवस आनंदी झाला. (विशेष पान २वर)