बसस्थानक परिसरात दारुड्यांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:43+5:302021-02-07T04:09:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बाजारगाव : नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगावला औद्याेगिकीकरणामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील प्रवासी निवाऱ्याजवळ ...

बसस्थानक परिसरात दारुड्यांचा वावर
लाेकमत न्यूज नेटवर्क
बाजारगाव : नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगावला औद्याेगिकीकरणामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील प्रवासी निवाऱ्याजवळ दिवसभर दारू पिणाऱ्यांचा वावर असताे. त्यामुळे या ठिकाणी बस व इतर प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करण्यासाठी उभ्या राहणाऱ्या व ये-जा करणाऱ्या महिला, तरुणी व विद्यार्थिनींची कुचंबणा हाेत आहे. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह लाेकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
या प्रवासी निवाऱ्याची निर्मिती मार्चमध्ये करण्यात आली. त्यामुळे ऊन, थंडी व पावसात उभे राहून प्रवाशांना वाहनांची प्रतीक्षा करावी लागायची. यात सर्वाधिक त्रास महिला, विद्यार्थिनी व तरुणींसह लहान मुलांना व्हायचा. प्रवासी निवारा झाल्याने ही समस्या सुटणार असल्याची आशाही नागरिकांच्या मनात निर्माण झाली हाेती. शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने नागपूर व काेंढाळी येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी या प्रवासी निवाऱ्याजवळ बसची प्रतीक्षा करीत उभ्या असतात. त्यांना दारू पिणाऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागताे.
याच परिसरात पाेलीस चाैकी असून, चाैकीतील पाेलीस कर्मचाऱ्यांना तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला हा संपूर्ण प्रकार माहिती आहे. मात्र, याला आळा घालण्यासाठी कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. शिवाय, दारू पिणाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे पाेलीस व ग्रामपंचायत प्रशासनाचा उपयाेग काय, असा प्रश्नही महिलांसह तरुणी व विद्यार्थिनींनी केला असून, ही समस्या साेडविण्याची मागणी केली आहे.
...
बसथांब्याची मागणी
बाजारगाव येथे काही माेजक्याच बसचा थांबा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसाेय हाेत आहे. या ठिकाणी सर्वच बसला थांबा दिल्यास बाजारगाव, शिवा, सावंगा, आडेगाव, कातलाबोडी, डिगडोह, देवळी येथील नागरिकांसह विद्यार्थ्यांना अधिक सोयीचे होईल. त्यामुळे या मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.