दारुड्या पित्याचा मुलींवर चाकुहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:27+5:302021-01-08T04:24:27+5:30
नागपूर : दारुड्या ट्रकचालकाने आपल्याच मुलींवर चाकूने हल्ला करीत जखमी केले. बुधवारी एनआयडीसी पाेलीस स्टेशन अंतर्गत वानाडाेंगरी वस्तीत ही ...

दारुड्या पित्याचा मुलींवर चाकुहल्ला
नागपूर : दारुड्या ट्रकचालकाने आपल्याच मुलींवर चाकूने हल्ला करीत जखमी केले. बुधवारी एनआयडीसी पाेलीस स्टेशन अंतर्गत वानाडाेंगरी वस्तीत ही घटना घडली. पाेलिसांनी आराेपी ट्रकचालक चंद्रशेखर गाेपाल सराेदे (४२) याला अटक केली.
सराेदेच्या कुटुंबात पत्नी, दाेन मुली व मुलगा आहे. त्याला दारूचे व्यसन आहे व दिवसभर या अवस्थेत असताे. संशयातून पत्नीशी भांडण करून मारहाण करीत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. बुधवारी पत्नी रुग्णालयात गेली हाेती. यादरम्यान २ वाजता ताे घरी पाेहचला व मुलींसाेबत भांडण करायला लागला. यातच घरातील भाजी कापायचा चाकू घेऊन लहान मुलीवर चालून गेला. तिला वाचविण्यासाठी माेठी बहीण धावली आणि वडिलांना पकडण्याचा प्रयत्न केला. नशेत संतापलेल्या सराेदेने दाेन्ही मुलींना चाकू मारून जखमी केले. मुलींना जखमी केल्यानंतर त्याने घरातील सामानांची फेकाफेक केली आणि मुलींना जीवे मारण्याची धमकी देत ताे घराबाहेर पडला. दाेन्ही मुलींना नंतर रुग्णालयात नेण्यात आले. एमआयडीसी पाेलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपी चंद्रशेखरला अटक केली. त्याच्या अशा वागण्यामुळे कुटुंबात दहशतीचे वातावरण आहे. त्याने यापूर्वीही कुटुंबीयांना मारहाण केली हाेती पण चाकूने हल्ला करेल, हा विचार कुणी केला नव्हता.