शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मद्यधुंद बसचालक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:22 AM

मद्यधुंद अवस्थेत परसोडीजवळ एका कंटेनरला धडक देणाºया एसटी महामंडळाच्या चालकाचे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी तातडीने निलंबन करून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळातील इतरांवरही प्रकरण शेकणार : प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मद्यधुंद अवस्थेत परसोडीजवळ एका कंटेनरला धडक देणाºया एसटी महामंडळाच्या चालकाचे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी तातडीने निलंबन करून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान या चालकाला दारू पिऊन असताना बस देणाºया आणि नियंत्रण कक्षात ड्युटीवर जाण्याची परवानगी देणाºया अशा इतर एसटी कर्मचाºयांवरही कारवाई होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.रविवारी सायंकाळी एसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारातून एम. एच. १४, बी. टी. ४४११ क्रमांकाची बस घेऊन कैलाश शेळके हा चालक नांदेडकडे निघाला. तो मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे दारूच्या नशेत त्याने परसोडीजवळ एका कंटेनरला धडक दिली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत बसचालक बस सोडून फरार झाला होता. या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी बसचा चालक कैलाश शेळके याच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती एसटीच्या अधिकाºयांनी दिली.मद्यधुंद अवस्थेत बस सोपविलीच कशी ?बसचालक ड्युटीवर जाण्यापूर्वी वाहन निरीक्षक बसचालकास बसचा ताबा देतात. जर बसचा चालक दारू पिऊन होता तर तशा अवस्थेत गणेशपेठ आगारातील वाहन निरीक्षकाने बस त्याच्या ताब्यात कशी सोपविली हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय बस प्लॅटफार्मला लावल्यानंतर नियंत्रण कक्षात बसलेल्या नियंत्रकांच्याही हा प्रकार लक्षात आला नाही. त्यामुळे महामंडळातील निरीक्षक, नियंत्रक ड्युटी बजावतात की काय करतात ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यातील दोषी अधिकारी, कर्मचाºयांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.पुण्यातील घटनेचा महामंडळाला विसरपुण्यातील एसटी महामंडळाच्या एका बसचालकाने रस्त्यावरील नागरिकांना चिरडल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने बस आगारातून बाहेर पडताना सुरक्षा कर्मचाºयाकडून बसच्या चालकाचे ओळखपत्र, तो दारू पिऊन आहे काय याची तपासणी सुरू केली. नागपूर विभागातही ही तपासणी सुरु करण्यात आली. परंतु कालांतराने एसटी महामंडळाला या घटनेचा विसर पडल्यामुळे पुन्हा ही गंभीर घटना घडली. बस डेपोबाहेर पडताना तपासण्याची ही पद्धत सुरू असती तर मद्यधुंद अवस्थेतील बसचालक गेटवरच पकडल्या गेला असता. मात्र, काही दिवस योजना सुरू करायची आणि नंतर बंद करण्याच्या महामंडळाच्या धोरणामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होणार‘मद्यधुंद अवस्थेतील बसचालकाने कंटेनरला धडक दिल्याच्या घटनेची एसटी महामंडळाने गंभीर नोंद घेतलेली आहे. हा बसचा चालक दारू पिऊन असताना त्याला बस कशी सोपविण्यात आली, नियंत्रण कक्षातील कर्मचाºयांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करण्यात येईल. यात दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.’- सुधीर पंचभाई, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग.एसटी बसेस बाहेर पडण्याच्या मार्गावर पूर्वी लोखंडी रॉड आडवा करून बसेसची तपासणी करण्यात येत होती. परंतु काही काळानंतर ही तपासणी बंद करून एसटी महामंडळाने बसेस बाहेर पडण्याच्या मार्गावर तैनात करण्यात आलेले सुरक्षा रक्षकही काढून घेतले आहेत. त्यामुळे रविवारी मद्यधुंद चालक बस बाहेर घेऊन जाण्यात यशस्वी झाला. बसेस अडविण्यासाठी वापरण्यात येणारा हा लोखंडी रॉडही अर्ध्यातून तुटल्याचे चित्र गणेशपेठ स्थानकावर दिसले.