शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

यूपीचा ड्रग तस्कर सलमान खान नागपुरात गजाआड : कृत्रिम पायातून करत होता ड्रग्जची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:47 PM

UP drug smugglerar arrested उत्तर प्रदेशातील ड्रग्ज तस्कर सलमान खान नादिर खान (वय २४) याच्या स्थानिक एनडीपीएसच्या पथकाने सोमवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या मुसक्या आवळल्या. दिव्यांग असलेला सलमान खान यूपीच्या फैजाबाद जिल्ह्यातील ऐहार रुदोली येथील रहिवासी आहे. तो एका पायाने दिव्यांग असून त्याच कृत्रिम पायातून तो अंमली पदार्थांची नागपूरसह देशातील विविध भागात तस्करी करीत होता.

ठळक मुद्दे मुंबईतून आणली होती खेप : एमडी आणि चरस जप्त : एनडीपीएसची रेल्वेस्थानकाजवळ नाट्यमय कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उत्तर प्रदेशातील ड्रग्ज तस्कर सलमान खान नादिर खान (वय २४) याच्या स्थानिक एनडीपीएसच्या पथकाने सोमवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या मुसक्या आवळल्या. दिव्यांग असलेला सलमान खान यूपीच्या फैजाबाद जिल्ह्यातील ऐहार रुदोली येथील रहिवासी आहे. तो एका पायाने दिव्यांग असून त्याच कृत्रिम पायातून तो अंमली पदार्थांची नागपूरसह देशातील विविध भागात तस्करी करीत होता.

पोलिसांनी पकडू नये म्हणून ड्रग तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या करतात. गिफ्ट बॉक्स, मेडिसीन बॉक्स, चॉकलेट, मसाल्याच्या पार्सलमधून एमडी तसेच इतर अंमली पदार्थांची तस्करी करतात. मुंबईतील मोठ्या ड्रग्ज पेडलर्ससाठी काम करणारा यूपीचा सलमान कृत्रिम पायातून ड्रग्जची तस्करी करत असल्याची आणि तो वेळोवेळी नागपुरात खेप देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी सलमानवर कारवाईसाठी एनडीपीएसचे पथक कामी लावले होते. त्यानुसार सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकाच्या एक्झिट गेट समोर, संत्रा मार्केट जवळ पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले. त्याचा कृत्रिम डावा पाय तपासल्यावर पोलिसांना चक्क त्यात १३ लाख, १० हजार रुपयांची १३० ग्राम एमडी आणि तेवड्याच वजनाची ३९ हजारांची चरस सापडली.

सलमान अनेक वर्षांपासून ड्रग तस्करीत सक्रिय असून तो मुंबई येथून घेतलेले ड्रग कृत्रिम पायात भरतो आणि वेगवेगळ्या मार्गाने नागपुरात येतो. स्थानिक तस्करांना तो एमडीची खेप पोचवतो. दोन महिन्यांत तो चार वेळा अशाच प्रकारे नागपुरात येऊन गेला आणि त्याने एमडी तसेच चरसची मोठी खेप येथील तस्करांना दिल्याचे पोलीस

चौकशीत उघड झाले आहे. दिव्यांग असल्यामुळे त्याच्याकडे पोलिसांची नजर जात नव्हती. मात्र यावेळी त्याला पोलिसांनी जेरबंद केले.

वेगवेगळे मार्ग, वेगवेगळी साधने

सलमान मुंबई येथून घेतलेले ड्रग कृत्रिम पायात भरतो आणि वेगवेगळ्या मार्गाने कधी रेल्वे, कधी टॅक्सीने नागपुरात येतो. त्याला आज न्यायालयात हजर करून त्याची २३ मे पर्यंत पोलिस कोठडी मिळवण्यात आली.

विशेष मोहीम

अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात सोमवारी गुन्हे शाखेने विशेष धडक मोहीम राबविली. सोमवारी दुपारी ४ ते मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी तब्बल ८६ ठिकाणी छापे टाकून २१ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पोलिसांना काही ठिकाणी जुगार अड्डे, तर काही ठिकाणी शस्त्रही सापडले. ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जात आहे. सलमानच्या अटकेमुळे नागपूरसह ठिकठिकाणच्या ड्रग्ज तस्करांची नावेही उघड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करीArrestअटक