शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग स्मगलर आशी डे अखेर जेरबंद; पोलिसांनी लावला छडा, पॉश एरियातून चालवत होती नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 23:32 IST

मध्य भारतातील प्रमुख पाच ड्रग स्मगलर्स पैकी एक समजली जाणारी कुख्यात आशी डे हिच्या अखेर शुक्रवारी गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या.

 नागपूर : मध्य भारतातील प्रमुख पाच ड्रग स्मगलर्स पैकी एक समजली जाणारी कुख्यात आशी डे हिच्या अखेर शुक्रवारी गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. इंद्रप्रस्थ नगरात एका पॉश सदनिकेतून गेल्या तीन महिन्यापासून ती अमली पदार्थाच्या तस्करीचा गोरखधंदा करीत होती. उत्तर नागपुरातून अमली पदार्थाच्या तस्करीत उतरलेली आशी डे गेल्या वर्षभरात एक मोठी ड्रग सप्लायर म्हणून चर्चेला आली होती. ती आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून नागपूर आणि आजूबाजूच्या शहरात एमडी, चरसची तस्करी आणि विक्री करत होती.

तिच्या नेटवर्कची माहिती सहा महिन्यांपूर्वी पोलिसांना मिळाली. मात्र, ती हाती लागत नव्हती. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी कुख्यात ड्रग सप्लायर सलमान खान याच्या मुसक्या बांधल्या. सलमान मुळचा उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्याचा रहिवासी होय. मुंबईतील मोठ्या ड्रग पेडलर्ससाठी तो काम करीत होता. नागपुरातही नियमित एमडी आणि चरसची खेप पोहोचवत होता. तो एका पायाने अपंग असल्यामुळे कृत्रिम पाय लावून त्यातून ड्रग तस्करी करायचा. त्यामुळे त्याच्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नव्हते. पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना सलमान खान नागपुरात नियमित एमडी आणि चरस घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी एनडीपीएस पथकाला सलमानवर नजर ठेवण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सलमान नागपुरात येताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आशी डे भोवती कारवाईचा पाश आवळला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी आशी पोलिसांच्या हाती लागली. इंद्रप्रस्थ नगरात जमवला अड्डा आशीने तीन महिन्यापूर्वी इंद्रप्रस्थ नगरातील (भामटी) साई अर्चना रेसिडेन्सी मध्ये आठ हजार रुपये महिन्याने बेंगलोरच्या राव नामक महिलेची सदनिका भाड्याने घेतली होती. येथे ती तिच्या वृद्ध आईसोबत राहू लागली. तिच्या हालचाली प्रचंड संशयास्पद होत्या, असे आता शेजारी सांगत आहेत. पोलीस तिला शनिवारी न्यायालयात हजर करून तिच्या कोठडीची मागणी करणार आहेत. ---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ