शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
7
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
8
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
9
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
10
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
11
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
12
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
13
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
14
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
15
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
16
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
17
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
18
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
19
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
20
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

औषधे उत्पादक राज्य सोडण्याच्या तयारीत

By admin | Updated: June 11, 2014 01:25 IST

राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) स्वत:च केंद्राच्या नियमांचे उल्लंघन करीत पार्सल पोस्टाद्वारे औषधे निर्यात करणाऱ्यांवर औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन

आयपीडीए : औषध निर्यातीवरील बंदीने व्यापारी संकटात
नागपूर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) स्वत:च केंद्राच्या नियमांचे उल्लंघन करीत पार्सल पोस्टाद्वारे औषधे निर्यात करणाऱ्यांवर औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत आहे. यामुळे मागील चार महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची औषधे निर्यात ठप्प पडली आहे. याचा परिणाम औषधे उत्पादक कंपन्यांवरही पडला आहे. काही कंपन्या महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती भारतीय औषधे डीलर असोसिएशनचे (आयपीडीए) सचिव नवनीत वर्मा यांनी पत्रकारांना दिली.
वर्मा यांनी सांगितले की, देशाच्या बाहेर कोणत्याही प्रकारच्या निर्यातीसाठी केंद्र शासनाचे नियम लागू होतात. परंतु महाराष्ट्र एफडीएने फेब्रुवारी २०१४ पासून पार्सल पोस्टच्या माध्यमातून औषधांच्या ई-निर्यातीवर प्रतिबंध लावला आहे. निर्यातीसाठी प्रीस्क्रिप्शनची मागणी केली जात आहे. जेव्हा की विदेशांमध्ये औषधे थर्ड पार्टीच्या माध्यमातून पाठविली जातात. कुठेच औषधांचा दुरुपयोग किंवा अवैध व्यवसाय होत नाही. औषधांच्या एकूण ई-निर्यातीमध्ये महाराष्ट्राची भागीदारी ८० टक्के आहे. छोटे व मध्यम उद्योगांमध्ये ओळख असलेल्या औषधी कंपन्या हे निर्यात करतात. यातून राज्याला कोट्यवधीचा महसूल प्राप्त होतो. तरीही औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० चा गैरवापर आणि चुकीच्या अंमलबजावणीचा वापर याचा ठपका एफडीएने निर्यातदारांवर ठेवला आहे. एकीकडे केंद्र सरकार ई-निर्यातीला प्रोत्साहन देत असताना राज्याचे एफडीए औषधे उत्पादकांनाच राज्याच्या बाहेर पाठविण्यावर दबाव आणत आहे. यात लाखो लोक बेरोजगार होण्याची शक्यता आहे.
आयपीडीएचे अध्यक्ष सुनील फाळके यांनी सांगितले की, मोठ्या औषध कंपन्यांच्या इशाऱ्यामुळेच निर्यातीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. याला तत्काळ हटविणे आवश्यक आहे. असे न झाल्यास औषधे उत्पादक आणि निर्यातदार दुसऱ्या राज्यात जाण्याचा धोका आहे. याची माहिती आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनाही दिली आहे. (प्रतिनिधी)