शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात : हायकोर्टाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:23 PM

प्रतिबंधित अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले.

ठळक मुद्देगुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका आवश्यक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : प्रतिबंधित अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. तसेच, अशा अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त के ले.मेफॅड्रॉन हा प्रतिबंधित अंमली पदार्थ विकणाऱ्या इम्रान इलयास डल्ला या आरोपीने नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे विचार मांडून त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. अमली पदार्थ विक्री हा समाजाविरुद्धचा गुन्हा आहे. गुन्हेगार आर्थिक लाभाकरिता मेफॅड्रॉनसारखे प्रतिबंधित अमली पदार्थ विकून देशाच्या युवा पिढीला नष्ट करीत आहे. हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे आरोपीला जामिनावर सोडण्याचे काहीच कारण दिसून येत नाही असे न्यायालयाने पुढे नमूद केले.गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी डल्लाला ५५ ग्रॅम मेफॅड्रॉनसह अटक केली होती. त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्र्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झालेले नाही, ही बाबदेखील न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना विचारात घेतली. न्यायालय समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष करू शकत नाही असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले. सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन रोडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDrugsअमली पदार्थ