शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकासह तरुणाला जलसमाधी : भरधाव कार वडगाव धरणात शिरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 19:17 IST

Car Accident,Drowning Professor चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि ती कार वळणावर थेट धरणात शिरली. त्यात कारमधील प्राध्यापकासह तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. ही घटना बेला (ता. उमरेड) शिवारातील वडगाव (रामा डॅम) धरणात शुक्रवारी (दि. ९) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बेला शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (बेला) : चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि ती कार वळणावर थेट धरणात शिरली. त्यात कारमधील प्राध्यापकासह तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. ही घटना बेला (ता. उमरेड) शिवारातील वडगाव (रामा डॅम) धरणात शुक्रवारी (दि. ९) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.प्रा. आंचल रमाकांत पांडे (४०) व सुशील मोहन अड्याळकर (३५) दोघेही रा. वर्धा अशी मृतांची तर जितेंद्र चलानी (४०), संतोष सोनक्षेत्र (३७) व अमोल पालेवार (४५) तिघेही रा. सिंदी (रेल्वे), जिल्हा वर्धा अशी जखमींची नावे आहेत. प्रा. आंचल पांडे आणि सुशील अड्याळकर एमएच-३२/एएच-२७६८ क्रमांकाच्या कारने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वर्ध्यावरून निघाले. ते सुरुवातीला सिंदी (रेल्वे) येथे गेले. जितेंद्र, संतोष व अमोल या तिघांना घेऊन ते सायंकाळी बेला मार्गे वडगाव धरण परिसरात गेले.तिथे काही वेळ मौजमस्ती केल्यानंतर ते जवळ असलेल्या शनिमंदिरात दर्शनासाठी गेले. तिथून परत येत असताना रोडच्या वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट धरणात शिरली. त्यात प्रा. आंचल पांडे व सुशील अड्याळकर या दोघांचा बुडून मृत्यू झाला. उर्वरित तिघे जखमी झाले असून, ते कसेतरी पाण्याबाहेर निघाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर जखमींना उपचारासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी बेला पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.काचा फोडून निघाले बाहेरप्रा. आंचल पांडे हे वर्धा शहरातील जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स येथे प्राध्यापकपदी नोकरी करायचे तर सुशीलचे वडील वर्धा शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात. कार पाण्यात शिरताच जितेंद्र, संतोष व अमोल हे काचा फोडून बाहेर पडले. त्यानंतर तिघांनी बेला गाठले आणि सुधाकर भोंडगे यांना माहिती दिली. सुशीलला स्टेंअरिंग व्हीलमुळे तर प्रा. पांडे यांना त्यांच्या बाजूला कार झुकल्याने बाहेर पडणे शक्य झाले नाही.

टॅग्स :Accidentअपघातdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू