वाहन परवाना शिबिर ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:36+5:302021-04-11T04:08:36+5:30

नरखेड : मागील काही महिन्यापासून नरखेड तालुक्यातील वाहनधारकांना वाहन परवाना मिळावा यासाठी विश्रामगृह येथे महिन्यातून एकदा आरटीओ कार्यालय नागपूर ...

Driving license camp is a headache | वाहन परवाना शिबिर ठरतेय डोकेदुखी

वाहन परवाना शिबिर ठरतेय डोकेदुखी

नरखेड : मागील काही महिन्यापासून नरखेड तालुक्यातील वाहनधारकांना वाहन परवाना मिळावा यासाठी विश्रामगृह येथे महिन्यातून एकदा आरटीओ कार्यालय नागपूर यांच्याकडून शिबिराचे आयोजन करण्यात येते. तरीही परवाना तयार करण्याची प्रक्रिया सहजसुलभ होण्यापेक्षा अधिकाधिक अडचणीची ठरत आहे. ही प्रक्रिया परवाना धारकांसाठी सुलभ करण्यात यावी अशी मागणी जनसेवा संस्थेने केली आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांना शिबिराची तारीख मिळत नाही. वाहन परवाना प्राप्त करण्यासाठी ७६६ रुपये शासकीय शुल्क भरावे लागते. परंतु काही नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया कळत नसल्याने तेच काम नाईलाजास्तव दलालामार्फत ५ ते ७ हजार रुपये देऊन करावे लागते. अशी गरजू परवानाधारकाची ओरड होती. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ करावी व नागरिकांची लुबाडणूक थांबवावी अशी मागणी जनसेवा संस्थेने केली आहे. त्यांनी यासंबंधी आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिबिर स्थळी सोप्या भाषेत माहितीचे फलक लावण्याची विनंती सुध्दा केली. या वेळी सुरेश शेंदरे, विनायक पिंजारकर, दीपक ढोमणे,लहुजी वैद्य, विजय दातीर, सतीश टेकाडे, रणजित गजभिये, प्रकाश सनेसर, दीपक बेहरे, अजय वंजारी आदी उपस्थित होते.

Web Title: Driving license camp is a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.