शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटकांचा ट्रक उड्डाणपुलावर सोडणारा चालक गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 08:17 IST

डिझेलने केला घोळ; तपास यंत्रणांची धावपळ

ठळक मुद्देतेथे पोहचलेल्या वरिष्ठांसह दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच अन्य तपास यंत्रणांचीही धावपळ वाढली. पोलिसांनी डिझेल आणून भरले मात्र एअरमुळे पंपमध्ये बिघाड झाल्याने ट्रक सुरूच होईना.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापासून १०० मीटर अंतरावर, उड्डाणपुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक सोडून पळ काढणारा आरोपी ट्रकचालक धर्मेंद्र कृष्णपाल याला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या निष्काळजीपणामुळे शहर पोलीस आणि विविध तपास यंत्रणांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत खळबळ उडाली. पण ट्रक दुसरीकडे हलविल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

नागपूर-वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर एक ट्रक बराच वेळ उभा असल्याची माहिती शुक्रवारी प्रतापनगर पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार दिनकर ठोसरे यांनी तेथे सहकाऱ्यांसह जाऊन बघितले असताना ट्रक बंद अन् चालक गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ट्रकमधील कागदपत्रे तपासल्यानंतर त्यातील एका मोबाइल नंबरवर संपर्क केला. त्यानंतर या ट्रकमध्ये स्फोटके असल्याची माहिती त्यांना मिळाली. ज्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेला ट्रक (छत्रपती चाैकाजवळ उड्डाणपुलावर) होता ते ठिकाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापासून अवघे १०० मीटर अंतरावर असल्याने पोलीसच नव्हे तर सर्वच तपास यंत्रणा हबकल्या. अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. कसेही करून चालकाला शोधा आणि ट्रक तेथून हलवा, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, ट्रकमालकाने दिलेल्या मोबाइलवर पोलिसांनी संपर्क केला. मात्र ट्रकचालकाने डिझेल संपल्याने ट्रक तेथे सोडल्याचे सांगून स्वत:चा मोबाइलच बंद करून टाकला. 

तेथे पोहचलेल्या वरिष्ठांसह दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच अन्य तपास यंत्रणांचीही धावपळ वाढली. पोलिसांनी डिझेल आणून भरले मात्र एअरमुळे पंपमध्ये बिघाड झाल्याने ट्रक सुरूच होईना. त्यामुळे पोलिसांनी अनेक मेकॅनिक तेथे आणले. त्यांनी मध्यरात्री तो ट्रक सुरू केला आणि स्फोटकांनी भरलेला ट्रक तेथून सोनेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तेथे सुरक्षेचे अन्य उपाय केल्यानंतर पोलीस, बीडीडीएस आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मोबाइल सुरू, आरोपी ठाण्यातमोबाइल बंद करून पोलिसांची धडधड वाढवणारा आरोपी ट्रकचालक धर्मेंद्र याने अखेर त्याचा मोबाइल सुरू केला. त्याच वेळी पोलिसांनी त्याच्याशी संपर्क करून तू ये आणि ट्रक घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार, सकाळी धर्मेंद्र पोलिसांकडे आला व प्रतापनगर पोलिसांनी त्याला अटक केली. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस