ट्रॅक्टरवरून पडल्याने चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:09 IST2021-03-20T04:09:02+5:302021-03-20T04:09:02+5:30

खापरखेडा : वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ट्रॅक्टरचालकाचा उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. ...

Driver dies after falling from tractor | ट्रॅक्टरवरून पडल्याने चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टरवरून पडल्याने चालकाचा मृत्यू

खापरखेडा : वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ट्रॅक्टरचालकाचा उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर-पिपळा (डाकबंगला) मार्गावर गुरुवारी (दि. १८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

विजय अमलू यादव (२४, रा. आमकाेला, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. ताे एमएच-४०/एल-४३६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करायचा. इसापूर (ता. सावनेर) शिवारात विटांची भट्टी असल्याने ताे ट्रॅक्टर घेऊन भट्टीकडे जात हाेता. राेडवरील खड्ड्यातून त्याचा वेगात असलेला ट्रॅक्टर उसळला आणि ताे खाली काेसळला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याला लगेच खासगी दवाखान्यात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार नामदेव करीत आहेत.

Web Title: Driver dies after falling from tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.